महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त यश मिळवत 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने 132, शिवसेना (शिंदे गट) ने 57, तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 41 जागांवर विजय मिळवत महायुतीचा दबदबा कायम ठेवला आहे.
सत्तास्थापनेसाठी महायुतीत हालचाली सुरू असून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्याबाबत निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. 6-7 आमदारांमागे एक मंत्रिपद दिले जाणार असल्याची शक्यता असून भाजपला 22-24, शिवसेनेला 10-12, आणि राष्ट्रवादीला 8-10 मंत्रिपदांचा वाटा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासोबत महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागली यावरही निर्णय झालाच समजतं. बघूयात महायुतीतील मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी
मंत्रिमंडळात ‘या’ 27 चेहऱ्यांना मिळणार संधी?
भाजपमधून यांची मंत्रिमंडळात वर्णी
देवेंद्र फडणवीस
गिरीष महाजन
सुधीर मुनगंटीवार
चंद्रशेखर बावनकुळे
मंगलप्रभात लोढा
सुरेश खाडे
प्रवीण दरेकर
पंकजा मुंडे
राहुल कुल
नितेश राणे
चित्रा वाघ
प्रसाद लाड
किसन कथोरे
शिंदेंचे संभाव्य मंत्री
एकनाथ शिंदे
भरत गोगावले
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
संजय राठोड
गुलाबराव पाटील
दादा भुसे
राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री
अजित पवार
धननंज मुंडे
दिलीप वळसे पाटील
आदिती तटकरे
छगन भुजबळ
धर्मरावबाबा आत्राम
अनिल पाटील
दरम्यान सोमवारी 25 नोव्हेंबरला होणाऱ्या शपथविधीमध्ये कोण कोण मंत्री शपथ घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.