आगामी गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती यासारख्या सण व उत्सवांना कुठेही गालबोट लागून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखाली शक्तिप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पोलिसांच्या शक्ती प्रदर्शनामुळे गुंड, मवाली, समाजकंटक गुन्हेगारांना चांगलाच वचक बसला आहे. अनेक बदमाश परागंदा झाले असल्याची चर्चा सुरू आहेत.
सण व उत्सवांच्या काळात सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यासह सामाजिक वातावरण प्रफुल्लित आणि भक्तिमय राहण्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी पोलिस ठाण्यांच्या अधिकारी कर्मचारी यांना तशा सूचना दिल्या आहेत. एकीकडे पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गावगुंड, समाजकंटक तथा सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर उचित कारवाई करण्याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे, तर दुसरीकडे खासगी वा सार्वजनिक ठिकाणी उपद्व्याप करणाऱ्या बदमाशांच्या उरात धडकी भरावी या हेतूने पोलिसांनी रूट मार्चचे आयोजन केले होते.
पोलिसांनी परिसरात रूट मार्च केला. अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्त्यांची शांततेला साथ अग्रभागी पोलिसांची वाहने आणि वरिष्ठ अधिकारी रूट मार्चचे नेतृत्व करत होते. अचानकपणे रस्त्यावर उतरलेला सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा बघून पादचाऱ्यांना मोबाइलद्वारे क्लिक करण्याचा मोह आवरता येत नव्हता. याच रूट मार्चचा संवेदनशील परिसरावर निश्चित परिणाम होत असतो. या परिसरात सण व उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते परिसरातील वातावरण प्रफुल्लित आणि भक्तिमय राहण्याकरिता आपापल्या परीने प्रयत्न करत असतात
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.