संसदेमध्ये सहावेळा जाऊनही कसली ही भाषा? सैतान, बाटली, बूच हे शब्द शोभतात काय? रायगडची जनताच तुम्हाला बाटलीत बंद करेल : खा.सुनील तटकरे यांचे पोलादपूरला प्रत्युत्तर

Sunil Tatkare Prachar Naral3
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
संसदेत सहा वेळा निवडून गेल्यानंतर विरोधकांची भाषा सैतान, बाटलीबंद, बूच  लावेन, अशी असेल तर हे शब्द शोभत नाहीत. विकासाची कामे सांगता येत नसतील तर अशी भाषा कायम ठेवा  म्हणजे रायगडची जनताच तुम्हाला बाटलीमध्ये बंद करेल, असे सणसणीत प्रत्युत्तर रायगड 32 लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा.सुनील तटकरे यांनी पोलादपूर येथील प्रचारसभेमध्ये दिले.
याप्रसंगी व्यासपिठावर आ. भरतशेठ गोगावले,कोकण प्रदेश युवासेना कोअर कमिटी अध्यक्ष विकास गोगावले, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाड विधानसभा ज्येष्ठ नेते सुभाष निकम, महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, पोलादपूर तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, अजित खेडेकर, पोलादपूरचे ज्येष्ठ व्यापारी व माजी सरपंच शिरीष साबळे, शिवसेना महिला संघटिका निलीमा घोसाळकर, महाड तालुका संघटिका स्वप्ना मालुसरे, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, किशोर जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, भाजपचे तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, नगरपंचायतीच्या अर्थ व नियोजन सभापती अंकिता जांभळेकर निकम, शहर अध्यक्ष राजाभाऊ दिक्षित,समीर सुतार, तालुका अध्यक्षा मंगला झाडाणे, शहर अध्यक्षा उज्ज्वला तथा माई शेठ, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरसेविका शिल्पा दरेकर, अस्मिता पवार, नगरसेवक प्रसाद इंगवले, विनायक दिक्षित, सिध्देश शेठ, सुरेश पवार, शिवसेना तालुका संघटीका सुवर्णा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.भरत गोगावले यांनी आपण 20-25 हजारांच्या फरकाने निवडून आलो तेव्हा विरोधकांनीही आपले फोन करून अभिनंदन केले. पण खासदार गीते यांनी कधीही फोन करून अभिनंदन केले नाही. जो आमचा होऊ शकला नाही तो माणूस तुमचा तरी कसा होईल, असा सवाल करून आ.गोगावले यांनी यावेळी सुनील तटकरे यांना खासदार होण्यासाठी मतदान करताना मतदान यंत्रावर शिवसेनेचे धनुष्यबाण शोधत बसू नका. यावेळी आपल्याला घडयाळ चिन्हासमोरचे बटन दाबायचे आहे, असे आवर्जून सांगितले. यावेळी आमची सर्व ताकद मतांच्या रूपाने तुमच्या पारडयात टाकू आमच्यावेळी तुम्हीही कोणतीही कसर सोडू नका, असे आवाहनही आ.गोगावले यांनी केले.
शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी,गीते यांना आठवेळा उमेदवारी मिळाली. दोन वेळा पराभूत झाले. सहावेळा खासदार दोनवेळा मंत्री झाले. 2014 मध्ये पोलादपूरकरांच्या ॠणातून उतराई होण्यासाठी अनंत गीते यांनी मिठी मारून बांबू फैक्टरी आणणार असे सांगितले. बांबू फॅक्टरी आणली नाहीच, अवजड उद्योग मंत्री असतानाही कोणतेही उद्योग आणणे त्यांना जमले नाही यंदा आणू पुढल्या वर्षी आणू पुढच्या टर्मला नक्की, असे म्हणत पुढील अनेक वर्षे नुसतेच खेळवण्याचा विचार दिसून आल्याने आम्ही 2019 मध्येच त्यांचा प्रचार करण्याचे थांबविले आता उघडपणेच विरोध करतोय. कोणतीही विकासकामे ठोसपणे न करता कितीवेळी निवडून येण्याचा ध्यास आहे, हे लक्षात घेऊन मतदारांनी त्यांना घरी बसविले आहे, अशी जोरदार टीका केली. यावेळी विकास गोगावले यांनीही अनंत गीते यांनी केलेल्या भुलथापांचा पाढा वाचून गीते यांनी महाड विधानसभा मतदार संघ आणि रायगड लोकसभा मतदार संघामध्ये कशी फसवणूक केली, याबाबत माहिती देत मतदारांमध्ये जनजागृती केली.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत यांनी, देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला जगातून सर्वत्र मान्यता मिळत असताना देशातही मोदी यांच्या विविध विकासकामांसह जनतेच्या लाभाच्या काही योजना मिळत असल्याने जनतेमध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्याचा निर्णय झाला असल्याचे यावेळी सांगून केंद्र व राज्यसरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.
प्रारंभी लक्ष्मण मोरे, तुकाराम केसरकर, किशोर जाधव,  शिवसेना महिला संघटिका निलीमा घोसाळकर, महाड तालुका संघटिका स्वप्ना मालुसरे यांची समयोचित भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading