कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील संभे येथे एकाच दिवशी पती व पत्नी यांचे आकस्मित दुःखद निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शॉक व्यक्त केला जात आहे. रावजी दामा सानप (वय ७७ ) व निर्मला रावजी सानप (वय ७२)या दाम्पत्यांचे एका मागून एक असे एकाच दिवशी दुखद निधन झाल्याने सानप परिवारावर व संपूर्ण गावावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे.
संसाराचा गाडा एकत्रित ओढणाऱ्या पती पत्नीचे एकाच दिवशी निधन ही घटना सर्व सामान्य माणसांच्या मनाला वेदनादायी ठरत आहे. शुक्रवार दि.११/४/२०२५ रोजी पती रावजी दामा सानप यांचे सकाळी निधन झाले असुन त्यांचे अंत्यविधी सुरु असतांना त्या मागून त्यांच्या पत्नीचे दोन तासाच्या फरकाने निधन झाल्याने सानपपरिवारावरमोठेदुःखओढवले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, नातू,व मोठा सानप परिवार आहे. त्यांचे पुढील दशक्रिया विधी रविवार दि. २०/४/२०२५ तर उत्तरकार्य विधी मंगळवार दि. २२/४/२०२५ रोजी त्यांच्या संभे येथील निवास्थानी होणार आहेत.