संभाजी भिडे गुरूजींच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी उमरठला धारकरी महासागर

Umarath Bhide Guruji 1
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक, छत्रपती शिवजयंती आणि छ.शिवाजी महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गेल्या सहा वर्षांपासून रायगडावर सुरू केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुरूवर्य संभाजी भिडे गुरूजी यांच्या उपस्थितीत रायगडावर छ.शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. आताच संवाद मेळाव्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान झाल्यानंतर येण्याचे निमंत्रण दिले असल्याची स्पष्टोक्ती रोहयो, फलोत्पादन व खारलॅण्ड मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी उमरठ येथे संभाजी भिडे गुरूजींच्या धारातिर्थ गडकोट मोहिमेसाठी आलेल्या धारकरी महासागरासमोर बोलताना केली.
यावेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी मार्गदर्शक संस्थापक संभाजी भिडे गुरूजी, सांगलीचे अविनाशबाबू सावंत, सेनापती अशोकराव वीरकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई तसेच असंख्य धारकरी आणि माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तसेच मान्यवर उपस्थित होते.
शुक्रवारी संध्याकाळी कापडे बुद्रुक व पितळवाडी येथे शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिला त्यांच्या मोठया उपस्थितीमध्ये स्वागत स्विकारून धारकरी मावळयांच्या शिस्तबध्द नियोजनात संभाजीराव भिडे गुरुजी श्री क्षेत्र उमरठ येथे रवाना झाले. उमरठ येथे हजारो धारकऱ्यांसमवेत भिडे गुरुजी यांनी नरवीर तानाजीराव मालुसरे व शेलारमामा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा घातली. यावेळी नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या तेराव्या वंशजांच्या मातोश्री शीतल मालुसरे यांनी भिडे गुरुजींसोबत संवाद साधला. कापडे बुद्रुक येथे अजय सलागरे, नारायण साने, निवृत्ती उतेकर, ज्ञानेश्वर सकपाळ व असंख्य शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिलांनी स्वागत केले.
Umarath Bhide Guruji
पितळवाडी येथे ढवळी कामथी सावित्री चालक-मालक वाहतूकदार संघटनेकडून संभाजीराव भिडे गुरुजी यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. वाहतुकदार संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ कुंभार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठान पोलादपूर तालुका अध्यक्ष दीपक उतेकर, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभागप्रमुख संजय मोदी, उबाठा सेना तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, माजी उपसभापती सुमन खेडेकर, सुमन केसरकर, सुमन कुंभार, माजी सभापती अर्चना कुंभार तसेच असंख्य मान्यवर या स्वागतासाठी उपस्थित होते. बोरज तसेच ठिकठिकाणी संभाजीराव भिडे गुरूजी यांच्या स्वागतासाठी महिला व पुरूष ग्रामस्थांची प्रचंड लगबग दिसून येत होती.
रायगड जिल्हाधिकारी जावळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि रोहयो खारलँड व फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र उमरठ येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख मार्गदर्शक संभाजीराव भिडे यांची भेट घेऊन पुढील नियोजन व कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी नरवीरांच्या 12 व्या वंशजांच्या सुनबाई शीतल मालुसरे यांनी संभाजीराव भिडे यांच्यासोबत चर्चा केली.
शनिवारी सकाळी धारातिर्थ मोहिमेसाठी नरवीर तानाजीराव मालुसरे समाधीस्थळी अभिवादन करून श्रीक्षेत्र उमरठ येथून श्रीदेवी तुळजाभवानीची आरती झाल्यानंतर लाखो धारकरी तरूणांनी काठया, नंग्या तलवारी, भाले तसेच शस्त्र आणि भगवे हाती धरून विरश्रीपूर्वक घोषणा देत उमरठ येथून श्रीमान शिवराजधानी रायगड धारातिर्थ गडकोट मोहिमेसाठी कूच केली. यावेळी संबळाच्या नादावर शेत रस्ता पायवाट तुडवित धारकरी तरूणांचा शिस्तबध्द समुदाय साखर येथे श्रीनरवीर सुर्याजीराव मालुसरे यांच्या समाधीस्थळी जमा होऊन संभाजीराव भिडे गुरुजी नरवीर सूर्याजीरावांच्या समाधीसह सतीशिळेवर माथा टेकवून नतमस्तक झाले. यावेळी नरवीरांचे 13वे वंशज अनिल मालुसरे तसेच मालुसरे भावकी, विजय दरेकर यांनी समाधीस्थळी धारकरी मंडळींचे स्वागत केले. यानंतर धारकरी मंडळी कारगिल शहिद तानाजी बांदल यांच्या समाधीस्थळी जाऊन आडावळे पोफळयाचा मुरा मार्गे मोहिमेसाठी रवाना झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading