संभाजीराव भिडे गुरूजींची आजपासून धारातीर्थ यात्रा; शुभारंभ नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळापासून 

Bhide Guruji Dharatirth Yatra
पोलादपूर (शैलेश पालकर) :
आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे अशी असीम स्वामीनिष्ठा दर्शवित हिंदवी स्वराज्यकामी प्राणाचे बलिदान देणारे उमरठचे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळापासून दर्शन घेत पुरंदरया युध्दात स्वामीनिष्ठेसाठी प्राण पणाला लावून झुंजणारे महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक येथील नरवीर मुरारबाजी देशपांडे समाधीस्थळी नतमस्तक होऊन दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ श्रीमान रायगडवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ठाणेची धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहीम माननीय संभाजीराव भिडे गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली हजारो शिस्तबध्द धारकरी यांच्या उपस्थितीत आज शुक्रवार, दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होणार आहे.
मंगळवार, दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही गडकोट मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यामार्फत जारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोजकांकडून उमरठ येथे देण्यात आली. यावेळी राज्याचे मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांच्यासह पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक उतेकर, सांगलीचे अविनाशबाबू सावंत, सेनापती अशोकराव वीरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत अधिकृत कार्यक्रम प्राप्त झाला असून नरवीर तानाजीराव मालुसरे समाधीस्थान श्रीउमरठे येथून दि. 7 रोजी दुपारी ठिक 1 वाजता श्रीतुळजाभवानीमातेच्या आरतीने मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मोहिमेचा मार्ग पिवळया रंगाने आखला असून मोहिमेचा ध्वज पुण्यश्लोक श्रीशिवाजी महाराजांचे प्रतिरूप असून त्या ध्वजापुढे न जाता धारकरी मंडळींनी ही गडकोट यात्रा पूर्ण करावयाची आहे. मंगळवार, दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहीम माननीय संभाजीराव भिडे गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ श्रीमान रायगडावर पोहोचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading