संप्रदायातील मुहूर्त चैतन्य बघायचे असेल तर खांब पंचक्रोशीत यावे : हभप सचितानंद कांबेकर यांचे प्रतिपादन

Hainam Saptah Khamb
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
गेली ६७ वर्ष अखंडपणे चालत आलेला खांब पंचक्रोशीचा अखंड हरिनाम जप सप्ताह परंपरेनुसार साजरा होत असल्याचा आनंद तसेच खांब पंचक्रोशीचे असलेले प्रेम कधीच विसरता येत नाही त्यामुळे सध्याच्या परिसथितीमध्ये भाऊ भाऊ एकत्रित राहत नाहीत तर गेली अनेक वर्ष येथील पाच गाव एकत्रित येऊन हा सोहळा उत्साहात सालाहाबाद प्रमाणे साजरा होत आहे त्यामुळे हा नाम जप यापुढेही अखंड चालत राहणार यांची मनात शंका नाही तसेच याला कोणाची दृष्टी ही लागणार नाही वै.स्वानंद सुख निवासी गुरूवर्य अलिबागकर महाराज, गुरुवर्य गोपाळ महाराज वाजे,गुरूवर्य धोंडू महाराज कोल्हटकर यांच्या पवित्र चरणानी पावन झालेली ही भूमी त्यांनी ६७ वर्षापूर्वी लावलेले रोपट त्याच वट वृक्षात रूपांतर झाले आहे जेवढं वटवृक्ष वर पसरेला आहे तेवढेच ते खोलवर त्याची मुले पसरलेली असतात त्यामुळे या साधू संतांचे कृपाशीर्वादामुळेच हे वैभव प्राप्त झाले त्यामुळे वारकरी संप्रदायातील खरे चैतन्य बघायचे असेल तर त्यांनी खांब पंचक्रोशीतील अखंड हरिनाम सप्ताहाचे आनंद घेण्यास यावे असे प्रतिपादन हभप साचिदानंद कांबेकर महाराज यांनी नडवली येथील किर्तनरूपी सेवत केले.
३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी यांचा ६७ वे अखंड हरिनाम नाम जप सप्ताह उत्सव मौजे नडवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असून पाचव्या दिवसाच्या किर्तन रूपी सेवेत कांबेकर महाराज मार्गदर्शन करत होते. गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरुवर्य गोपाळ महाराज वाजे, गुरूवर्य धोंडू महाराज कोल्हटकर, यांच्या कृपाशीर्वादाने हभप नारायण दादा वाजे (अलिबागकर) तसेच दत्तू महाराज कोल्हटकर पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड भूषण तसेच खांब पंचक्रोशीचे वैभव तथा आधिस्थान हभप मारूती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली खांब पंचक्रोशी यांच्या सौजन्याने आणि नडवली ग्रामस्थ, महीला मंडळ, युवक मंडळ आणि मुंबई कर आणि आदिवासी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह.या निमित्ताने येथील युवकांच्या अथक परिश्रमाने विविध केलेली सजावट आणि कीर्तन कार महाराज यांचे आगमन स्वागतासाठी सज्ज झालेले ग्रामस्थ महीला आणि तरुण यांच्या विशेष सहकार्यातून सदरच्या किर्तन रूपी सेवेत या प्रसंगी अवतरले श्री संत ज्ञानेश्वर महाराज या चार भावंडांची जड भिंतीवरील वेशभूषा परिधान करून सजावट करण्यात आली त्यामुळे असंख्खे भाविकांना दर्शनाचा लाभ घडला.
प्रेम नये सांगता बोलता दाविता । अनुभव चित्ता चित्त जाणे ।। कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी। दुधा नाही भेटी अंगसंगें ।। पोटामध्ये कोणे सांगितले सर्पा । उपजत लपा म्हणउनि ।। बोलो नेणे परी जाणे गोड क्षार। अंतरी विचार त्यासी ठावा ।। तुका म्हणे बरे विचारावे मनी । आणिक भल्यांनी पुसो नये ।। या अभंगातून उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना सांगीतले की श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की श्री हरीचे प्रेम कसे असते, कोणत्या पद्धतीचे असते किंवा ते कसे वाटते हे त्याच्या भक्ताला कधीही सांगता किंवा बोलून दाखविता येत नाही, त्याचा फक्त चित्ताला अनुभव घेता येतो आणि त्यामुळे चित्तच ते जाणून असते. ते म्हणतात ज्याप्रमाणे कासवीचे पिल्लू त्याच्या आईच्या म्हणजेच कासवीच्या फक्त कृपादृष्टीने वाढते, त्याला वाढविण्याकरिता ती त्याला आपला अंगसंग देत नाही, स्तनपान करत नाही परंतु तरीदेखील ते प्रेमानेच वाढविले जाते तसेच श्री हरीचे प्रेम अद्भुत आहे. ज्याच्यावर ते बरसत असते तो सदा त्याच्यात न्हाऊन निघत असतो.
ते पुढे म्हणतात तसेच ज्याप्रमाणे सर्पाच्या पोटात असलेल्या त्याच्या पिल्लांना कोण सांगते की जसा तुमचा जन्म होईल तसे तुम्ही कोठेतरी लपून बसा नाहीतर तुम्हांला गिळले जाईल किंवा ते म्हणतात एखाद्या मुक्या माणसाला देखील जरी ‘गोड म्हणजे कसे असते किंवा खारट कसे असते’ हे सांगता येत नसले तरीदेखील त्याच्या अंतराला मात्र त्या दोघातील फरक हा अनुभवाने ठाऊक झालेला असतो.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की अगदी त्याप्रमाणे येथे कोणीही भल्या माणसाने म्हणजेच शहाण्या मनुष्याने कधीही चुकूनदेखील हरिभक्ताला केव्हाही विचारू नये की श्री हरीचे प्रेम कसे असते, किंबहुना त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावा जोपर्यंत त्याला स्वतःला त्याचा अनुभव येत नसल्याचे सांगत अनमोल विवेचन करत प्रेम कसे असावे ही पटवून दिले.
खांब, नडवली , तळवली, चिल्हे,आणि धानकान्हे या पाच गावांचा समावेश असलेली खांब पंचक्रोशी यांचा अखंड हरिनाम सप्ताप्ताह निमित्ताने नडवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यामुळे जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप श्री संत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,संत तुकाराम महाराज गाथेवरील भजन, हरिपाठ,प्रवचन , महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराज यांची किर्तन सेवा हरी जागर याचा लाभ भाविक भक्तांना मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading