पेण तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक रामशेठ घरत व त्यांच्या शिवराज मित्र मंडळाने अतुल म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा देत शेट्टीच्या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन राम शेठ घरत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
अतुल म्हात्रे यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा देणाऱ्या पक्षांची व कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे. माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या पाठोपाठ रामशेठ घरत यांनी पाठिंबा जाहीर केला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रामशेठ घरत यांनी भाजप कडून निवडणूक लढवून भाजपची पाळेमुळे पेण मतदारसंघात रुजविण्यासाठी त्याचे योगदान महत्त्वाचे होते. रामशेठ घरत यांचे समाजकार्य मोठे आहे. आदिवासी भगिनींनी त्यांना भाऊ मानले आहे. त्यावेळी ४००-५०० आदिवासी भगिनी त्यांना रक्षाबंधन व भाऊबीज करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात असत. त्यांना गृहोपयोगी वस्तू देऊन त्यांच्या संसाराला हातभार लागेल यासाठी त्यांची धडपड असे. भाजपवरील नाराजीने त्यांनी अतुल म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या सोबत प्रचारात सामील झाले आहेत.
सर्वांनी शिट्टी या निवडणूक चिन्हावर मतदान करत अतुल म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.