निळज धरणाचीवाडी येथे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबई मंडळ निळज धरणाचीवाडी यांच्यावतीने श्री स्वयंभू वाकडाई मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहणाचा सोहळा आनंदात साजरा झाला. खालूच्या तालावर लेझीम खेळत आनंदात उत्साहात देवीची पालखीत भव्य मिरवणुक काढण्यात आली.
रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी श्री स्वयंभू वाकडाई मंदिर भव्य जीर्णोध्दार सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वा. अभिषेक, सकाळी ९ वा. देवळाचे कळसपुजन, सकाळी १० वा. होमहवन, सकाळी ११ वा. कलशारोहण, दुपारी १२ वा. सत्यनारायणाची पुजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. उणेगाव भजन मंडळाचे भजन असा भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भटजी प्रसाद खैरे गुरूजी यांनी सगळे धार्मिक विधी उत्तम रित्या पार पाडले.
निळज धरणाचीवाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबई मंडळ यांनी अतिशय उत्तम व्यवस्थापन करून हे शुभ कार्य सिद्धीस नेले. मंदिराचे जीर्णोद्धार कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाले, ज्याने मंदिराला नवीन रूप प्राप्त झाले आहे. अनेक भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने भाग घेतला, ज्यामुळे वातावरण खूपच धार्मिक आणि आनंदमय झाले होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.