श्री विठ्ठल-रुक्मिणी नित्यपूजा व अन्य पूजांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

Viththal Rakhumai
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदनउटी पूजा यांसारख्या विविध पूजांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस २५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरुवात होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
दि. १ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील पूजांसाठी भाविकांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशी ही पूजा करता येणार आहे. यासाठी संगणकीकृत प्रणाली विकसित करण्यात आली असून भाविकांना नोंदणीसाठी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.vitthalrukminimandir.org भेट देता येईल.
ऑनलाइन नोंदणीला भाविकांचा चांगला प्रतिसाद
यापूर्वीच्या टप्प्यांत (७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४ आणि १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५) देशभरातील भाविकांनी श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन व पाद्यपूजेसाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली होती. या प्रक्रियेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता तिसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीतील पूजांची ऑनलाइन नोंदणी खुली करण्यात आली आहे.
ग्रीष्म ऋतूमध्ये श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्राच्या पावसाळी सुरुवातीपर्यंत दररोज दुपारी ‘चंदनउटी पूजे’ चा विशेष समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी ही पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
पूजांचे देणगी मूल्य
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा
श्री विठ्ठल : ₹२५,०००/-
श्री रुक्मिणीमाता : ₹११,०००/-
पाद्यपूजा : ₹५,०००/-
तुळशी अर्चन पूजा : ₹२,१००/-
चंदनउटी पूजा
श्री विठ्ठल : ₹२१,०००/-
श्री रुक्मिणीमाता : ₹९,०००/-
भाविकांना नोंदणी प्रक्रियेसंबंधी काही अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून मदत केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186-299299 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading