नागोठणे शहाराची ग्रामदैवता श्री. जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांची पालखी उत्सव रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. जोगेश्वरी मंदिरातून निघून संपूर्ण शहरात तीन दिवस तीन रात्र असे साधारण 64 तास अहोरात्र फिरून पालखीचे बुधवार 16 एप्रिल रोजी पहाटे 02.00 वा.च्या दरम्यान भक्तांना दर्शन देऊन मंदिरात आगमन झाले.यावेळी खा. सुनील तटकरे,आ.रविशेठ पाटील,मा.आ.अनिकेत तटकरे,द.जिल्हा भाजपा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील,उबाठा पेण अलिबाग कर्जत वि.स.संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेतले.
नागोठणे शहराची ग्रामदैवता श्री. जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांची चैत्र पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी साजरा होणारा पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. पालखी सोहळ्याच्या आदल्या दिवशी शनिवारी मंदिरात सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यानिमित्त दर वर्षी प्रमाणे या वर्षीही ग्रामस्थ मंडळ, खडकआळी यांनी देवीची काठी सजवून मंदिरासमोर उभी केली. पालखी निमित्ताने जोगेश्वरी मंदिर,मरीआई मंदिर, गणपति मंदिर तसेच मंदिराच्या परिसरातील तीन तळी व सभोवताली असलेल्या झाडांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ठरल्यानुसार पालखी रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. देवीची विधिवत पुजा करून मार्गस्थ झाली.
या सोहळ्यात सरपंच सुप्रिया संजय महाडिक, जोगेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र जैन, विश्वस्त भाई टके,उबाठा रा. जिल्हा सह संपर्क प्रमुख किशोर जैन,उत्सव कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर,उपाध्यक्ष संतोष चितळकर,सचिव विवेक देशपांडे, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अखलाक पानसरे,ग्रा.पं.सदस्य- ज्ञानेश्वर साळुंखे,ॲड.प्रकाश कांबळे,सचिन ठोंबरे,संतोष नागोठणेकर,ग्रा.पं.सदस्या- सुप्रिया काकडे,अमृता महाडीक,भाविका गिजे,पूनम काळे,ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे,माजी अध्यक्ष- हरिष काळे व विलास चौलकर यांच्यासह ट्रस्ट व उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी-सदस्य,ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत देवीचे मुखवटे सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांच्या आताषबाजी, ढोल ताशांच्या गजरात,‘श्री. जोगेश्वरी माते की जय,भैरवनाथ महाराज की जय’’,हर हर महादेवच्या जयघोषात, गोंधळी, वारकरी भजन मंडळ तसेच हजारो भक्तगणांच्या साथीने पालखी शहरामध्ये भक्तांना दर्शन देण्यासाठी मार्गस्थ झाली.रात्रभर फिरणार्या पालखीसाठी उत्तम प्रकारे जनरेटर व लाईटची तसेच बाहेर गावावरून आलेल्या भाविकांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
ही पालखी ग्रामपंचायत,बंगलेआळी, पोलिस ठाणे,खालची आळी,छत्रपती शिवाजी महाराज चौक,दोन्ही कोळीवाडे,छत्रपती शिवाजी पेठ,गांधी चौक,गवळ आळी,मराठाआळी कुंभारआळी,प्रभूआळी,आंगरआळी,जोगेश्वरी नगर,रामनगर,बाळासाहेब ठाकरे नगर तसेच खडकआळी परिसरातील आपल्या भक्तांना दर्शन देऊन तीन दिवस तीन रात्र असे जवळ जवळ 64 तासांनी बुधवार 16 एप्रिल रोजी पहाटे 02.00 वा. च्या दरम्यान मोठ्या भक्तिभावाने मंदिरात आगमन झाले.
गावकर्यांनी पालखीचे स्वागत घरासमोर मंडप,पताका,विद्युत रोषणाई,रांगोळी काढून, वाजत-गाजत, भक्तिभावाने पुजा-अर्चा करून तसेच आलेल्या भाविकांना चहा-नाश्ता व थंड पेय देवून केले. यावेळी उद्योगधंद्यासाठी बाहेरगावी गेलेले नागोठणेकर माहेरवाशींनी व परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखीच्या आगमनानंतर मंदिरात उत्सव कमिटीतर्फे पालखी सोहळ्यास सहभागी झालेले सर्व ढोल-ताशा पथक, गोंधळी,वारकरी संप्रदाय तसेच सहकार्य करणारे पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत,पत्रकार,देणगीदार तसेच इतर सहकार्य लाभलेल्याचे ट्रस्ट सचिव भाई टके,उत्सव कमिटी अध्यक्ष चंद्रकांत ताडकर तसेच इतर मान्यवर व कमिटी सदस्यांनी श्रीफळ व प्रसाद देऊन आभार मानले.सदरील पालखी उत्सव सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वेळेपूर्वी पालखी मार्गस्थ – जोगेश्वरी नगरमध्ये गेल्या वर्षी भक्तांना दर्शन देत पालखी साधारण सहा ते साडेसहा तास फिरली. परंतु या वर्षी येथील श्रीराम मित्र मंडळाच्या तरुणांनी पालखी लवकर मार्गस्थ करण्याची संकल्पना मांडली. व सदरील पालखी सर्वांनी मनोभावे पूजा अर्चा करीत कोणत्याही प्रकारच पालखीची घाई गडबड व अडवणूक न करता साधारण चार तास म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा दोन ते अडीच तास आधी मार्गस्थ केल्याबद्दल उत्सव कमिटी व नागोठणे पोलिसांनी जोगेश्वरी नगर मधील नागरिक व श्रीराम मित्र मंडळचे आभार व्यक्त केले असल्याची माहिती ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांनी दिली.
कौतुकास्पद निर्णय – रामनगरमध्ये दर वर्षी घरोघरी दर्शनासाठी फिरणारी पालखी या वर्षी सर्व रामनगर वासीयांनी एकमुखी निर्णय घेत पालखी साईबाबा मंदिरात ठेऊन त्या ठिकाणी सर्वांनी जाऊन पूजा अर्चा केली. त्यांच्या या निर्णयाचे नागोठणे विभागात कौतुक होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.