श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागोठणे दुमदुमले

Nagothane Jogeshwari Palki
नागोठणे (महेंद्र माने) :
ऐतिहासिक नागोठण्याची जागृत ग्रामदैवता असलेल्या श्री जोगेश्वरी माता आणि श्री भैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला रविवार 13 एप्रिल रोजी वाजतगाजत जल्लोषात प्रारंभ झाला. चैत्र वद्यप्रतिपदेच्या मुहूर्तावर यानिमित्ताने नागोठण्यात भक्ती व श्रद्धेचा जागर करण्यात आला. चौकाचौकात पालखीचे भाविकांनी स्वागत कराण्यात येत आहे. पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या असून या पालखी सोहळ्याने नागोठणे दुमदुमून जात आहे.
नागोठणे येथील तीन तळ्यांच्या मध्यभागी श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचे सुंदर मंदिर आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्य उगवताना व मावळताना त्याची किरणे मूर्तीवर पडतात. हनुमान जयंतीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी वाजतगाजत पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. उत्सवाचे औचित्य साधून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या उत्सवासाठी ठाणे, मुंबईसह पुण्यातील नागोठणेकर आणि माहेरवासिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांची पालखी टाळ-मृदुंगांच्या गजरात ग्रामपंचायतजवळ येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन तसेच सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांनी पूजा केली.
यावेळी सुप्रिया महाडिक यांनी किशोर जैन व देवस्थान जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांचे स्वागत केले. याप्रसंगी विश्वस्त समितीचे सचिव भाईसाहेब टके, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरंपच अखलाक पानसरे,ग्रा.पं.सदस्य- ज्ञानेश्वर साळुंखे,ॲड.प्रकाश कांबळे,सचिन ठोंबरे, संतोष नागोठणेकर, ग्रा.पं.सदस्या- सुप्रिया काकडे,अमृता महाडीक, भाविका गिजे,पूनम काळे, ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, विलास चौलकर, प्रकाश जैन, दीपक गायकवाड, कीर्तीकुमार कळस,रुचिर मोरे, प्रथमेश काळे, नितीन पत्की आदींसह ग्रा.पं. सदस्य व कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

Nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading