श्री जोगेश्वरी माता उत्सव कमिटीचे तीन वर्षाचे कार्य कौतुकास्पद : नरेंद्र जैन

Jogeshwari Utsav
नागोठणे (महेंद्र माने) : 
ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिरात रविवार 30 मार्च रोजी गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी 5.00 वाजता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज पालखी सोहळ्या निमित्त मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव दिलीप भाई टके, उत्सव कमिटी अध्यक्ष नितिन राऊत,मधुकर पोवळे,हरीश काळे, विलास चौलकर, बाळासाहेब टके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या सभेत श्री जोगेश्वरी माता उत्सव कमिटीने गेल्या तीन वर्षांत केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नरेंद्र जैन यांनी केले. यावेळी पुढील तीन वर्षाकरिता निवडलेल्या उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत ताडकर तर सचिवपदी विवेक देशपांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेमध्ये मागील जमा खर्च वाचून सर्वानुमते मंजूर केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना नरेंद्र जैन यांनी सांगितले की, गेली तीन वर्षे आपल्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष नितिन राऊत व सर्व पदाधिकार्‍यांनी केलेले सर्व कार्य कौतुकास्पद आहे आज त्यांचा कार्यकाळ संपत असून सर्वानुमते पूर्वी ठरल्याप्रमाणे पुढील तीन वर्षाकरिता चंद्रकांत ताडकर यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात येत असल्याचे जाहीर करून मंदिराची थोडी फार दुरूस्ती व रंगकाम करण्याकरीता मोठा खर्च अपेक्षित असून देवस्थानचे उत्पन्न फार कमी असले तरीही मातेचा आशीर्वाद व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सर्व नियोजित कामे व्यवस्थित पार पडणार असल्याचा विश्वास शेवटी नरेंद्र जैन यांनी व्यक्त केला.
यानंतर उत्सव कमिटीमध्ये प्रत्येक आळीतील दोन सदस्य घेण्यात येऊन त्यामधून कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष- संतोष चितळकर, सचिव- विवेक देशपांडे, खजिनदार- जितेंद्र कजबजे, सहसचिव- अनिल पवार, सहखजिनदार- सतिश पाटील तर सदस्यपदी विशाल खंडागळे, संतोष सकपाल, पंकज कामथे, अल्विन नाकते, रोहिदास हातनोलकर, प्रफुल नागोठणेकर, अनंता चितळकर, संजय पाटील, संतोष पाटील, बाबू कोळी, पांडुरंग कोळी, राज पाटील, हृषीकेश भोय, दिगंबर खराडे,प्रशांत पानकर, हितेश भोय, मच्छिंद्र साळुंखे, राजेंद्र गुरव व घनश्याम ताडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर,सचिव मंगेश कामथे, खजिनदार प्रथमेश काळे, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर साळूंखे, सचिन ठोंबरे व संतोष नागोठणेकर, संजय नांगरे,पांडुरंग कामथे, सुनील लाड,विठ्ठल तात्या खंडागळे, उदंड रावकर, संजय काकडे,राजेश पिंपळे,बाळाराम पोटे, दिनेश घाग, अशोक गुरव, विनोद अंबाडे, प्रवीण ताडकर,सुरेश गिजे, किसन भोय, संतोष जोशी, हरेश शिर्के, निलेश भोपी,प्रकाश मेस्त्री यांच्यासह ट्रस्ट व उत्सव कमिटी पदाधिकारी-सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading