शोभा कंकणवाडी यांचे निधन

Shobha

उरण ( विठ्ठल ममताबादे ) :

पनवेल शहरातील आदई सर्कल जवळ असलेल्या आयप्पा मंदिर समोर राहणारे महिला सामाजिक कार्यकर्त्या व आदर्श गृहिणी शोभा शिवप्पा कंकणवाडी (वय ६७)यांचे दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक नारायण कंकणवाडी यांच्या त्या आई होत्या.शोभा कंकणवाडी या एक आदर्श गृहिणी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. प्रेमळ व मनमिळावू व सर्वांना सोबत घेउन पुढे जाणाऱ्या व गोर गरिबांच्या सुख दुःखात नेहमी धावून जाणाऱ्या म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूने पनवेल शहरात व कंकणवाडी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मृत्यू पश्चात पती, १ मुलगा, ३ मुली, ७ नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
शोभा कंकणवाडी यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. शिवा संघटना तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading