शेतकरी कामगार पक्षाचे व महाविकास आघाडीचे 191 पेण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पेण तालुक्यातील जिते, पाचगणी व महलमिरा परिसरातील शेकडो तरुणांनी शेका पक्षाचा लाल बावटा हाती घेत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश जाहीर प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख जयेश म्हात्रे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह तर नामदेव भस्मा यांच्या नेतृत्वात पाचगणी येथील युवकांनी शेका पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी महलमिरा येथील अनेक युवकांनी अतुल म्हात्रे यांचे निशाणी असलेली शिट्टी वाजवीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून अतुल म्हात्रे यांचा विजय निश्चित केला आहे.
अतुल म्हात्रे यांचा विजयाचा अश्वमेध कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन शेका पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती महादेव दिवेकर यांनी यावेळी केले.
शेतजमिनीला अनन्यसाधारण महत्त्व
पेण मतदार संघ नवी मुंबई विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असल्याने येथील जमिनीला व शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. होऊ घातलेल्या विकासात येथील स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी विस्थापित होऊ नये याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही अतुल म्हात्रे यांनी यावेळी दिली.
शेतकरी हा केंद्रबिंदू असावा
ते पुढे म्हणाले की, आमचा विकासाला विरोध नाही पण विकास होताना येथील शेतकरी हा केंद्रबिंदू असायला पाहिजे. परप्रांतीयांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवर प्रकल्प राबवून अब्जोदिश होण्यापेक्षा येथील युवक विकासक व उद्योजक व्हायला पाहिजे. व त्या दृष्टीने शासनाचे कायदे बनवण्याकरिता किंबहुना त्या दुरुस्ती करण्याकरिता पेण विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार मला मतदान करून निश्चित विधानसभेवर पाठवतील याची मला खात्री आहे असा विश्वास यावेळी अतुल म्हात्रे यांनी बोलून दाखवीला.
NTDC प्रकल्प राबविण्याचा घाट
गडब परिसरात होऊ घातलेली MIDC मुळे 18 गाव बाधित होत आहेत. शासन शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही. त्याकरिता शेका पक्षाचे नेते व सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता आमचा लढा सुरू आहे. MMRDA प्रकल्प शासन जबरीने राबवण्याचा प्रयत्न करीत आहे त्या विरोधात आम्ही पुढाकार घेऊन 18000 हरकती शासनाकडे नोंदविले आहेत तिसऱ्या मुंबईचा पार्श्वभूमीवर शासनाने NTDC प्रकल्प राबविण्याचा घाट घातला आहे.
जबरीनं जमिनीचं संपादन
याकरिता 124 गावातील अकरा लाख एकर जमिन सक्तीने संपादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरीकरण्याच्या प्रकल्पात शासनाने जबरीने जमिनीचे संपादन करू नये. विविध प्रकल्प राबवताना शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर ठेवून त्यांना भागीदार बनवून प्रकल्पात हिस्सेदारी द्यावी. येथील स्थानिक नागरिकांना होणाऱ्या विकासात सुजलाम सुफलाम बनवण्याकरिता शेतकरी कामगार पक्षाच्या शिट्टीच्या बटणावर मतदान करून सर्वाधिक मताधिक्याने मला निवडून द्या असे आवाहन यावेळी म्हात्रे यांनी केले.
या कार्यक्रमाला नंदकुमार म्हात्रे, महेंद्र ठाकूर, महादेव दिवेकर, प्रल्हाद म्हात्रे, राजन झेमसे, मंगेश पाटील, राजेश पाटील, अजित म्हात्रे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.