शेकापचा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा, ज्यांनी गद्दारी केली त्यांना गाडून टाका : जयंतभाई पाटील

शेकापचा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यात रविवारी रोहा येथे शेकापचे जयंत पाटील, बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सुप्रिया पाटील, खजिनदार अतुल म्हात्रे, महाराष्ट्र राज्य महिला आघाडीप्रमुख मानसी म्हात्रे, नेते शंकरराव म्हसकर, गणेश मढवी, गोपीनाथ गंभे, मारुती खांडेकर, शिवराम महाबले यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा मोठया उत्साहात पार पडला. 
सदरच्या आयोजित मेळाव्यात रोह्यातील असंखें कार्यकर्ते पाहून जयंत पाटील अक्षरशः भारावून गेले. त्यामुळे पुन्हा त्या काळातील आठवणीना उजाळा देत टोलेबाजीचा प्रहार करत ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली ज्यांना पक्षाने मोठें केले काही पक्ष सोडून गेले काही विसरले अशांना गाडण्यासाठीच जिल्हयात तसेच तालुका स्थरावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली मुलूख मैदानी तोफ डागली. येत्या काळात यांना गाडण्यासाठी सज्ज व्हा जी चूक माझ्या कडून झाली ती पुन्हा होणार त्याची दिलगिरी कार्यकर्त्यांसमवेत व्यक्त करत खरपूस समाचार घेतला.
ज्यांनी आम्हाला आताच्या निवडणुकीत पाडले त्यांना पाडून त्यांची जागा दाखवून देऊ. जो पर्यंत मी आहे तोपर्यंत जिल्हा परिषद आपल्या हातून कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे पुन्हा ताकतीने पक्षाची वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्षासाठी काम करण्यासाठीं नव्या पिढीला तसेच महिलाना अधिक अधिक संधी दिली पाहिजे, पक्षात नवे बदल करण्यात येतील माझा विस्वास तुमच्यावर आहे. आजही शेकापची ताकद रोहा येथे दिसून आल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच पक्षात बदल घडवून आणायचे असेल तर तरुण महिलाना प्राधान्य देत जबाबदारी दिली पाहिजे असे प्रतिपादन रोहा येथील आयोजित करण्यात आलेल्या शासकिय विश्राम गृह येथील कार्यकर्ते संवाद मेळाव्यात शेकाप नेते जयंता भाई पाटील यांनी केले.
नवी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे हे उत्तम पक्षाचे काम करत युवा पिढीशी संवाद साधत आहेत त्याच बरोबर महीला म्हणून मानसी ताई तसेच चिऊताई या युवती आणि महीला यांच्याशी संवाद साधून नवी दिशा देण्याचे काम करत आहेत. आपण निवडणूकीत हरलो म्हणून मने खचली होती, पण खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने पक्ष उभा करू मी सदैव प्रयत्नशील आहे. पुढे पाहू,मी आजही आपल्या साऱ्या कार्यकर्त्यांना व्यक्तिशः नावासहीत ओळखतो असा विश्र्वास आणि आधार कार्यकर्त्यांना पाटील यांनी या प्रसंगी दिला.
रोह्यात अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यात सारेच भारावून गेले रोह्यात पुन्हा लाल बावटा फडकणार पराभव झाला असला तरी प्रचंड मताधिक्य मिळाले आहे ज्यांना मोठे केले ते खोटे निघाले आशा गद्दाराना गाडून टाकण्यासाठी पक्षाशी एकनिष्ठ रहा आपल्याच वोटिवर बसा विरोधकांच्या ओटीवर बसू नका घात होतो त्यामुळे नवी पिढी घडवायची आहे तर ती चांगली प्रशिक्षित करायची आहे. दोनशेहून अधिक महीला प्रशिक्षित करायच्या आहेत त्यांना शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करायच्या आहेत, त्यामुळे आता पुन्हा जोमाने कामाला लागा असे आवाहन केले, तर सच्चे कार्यकर्ते देशमुख यांनी आपल्या मनातली खदं खद व्यक्त करताना सांगीतले की तुम्हीच युती करून आम्हाला मत देण्यास सांगीतले व भाग पाडले आणि आमचे वाटोळे झाले असे म्हणता साऱ्या सभागृहातील कार्यकर्त्याची एक चीड आहे. एकच हशः त्यावर नेते पाटील यांनी चुकीची कबुली माफी देताच एकच टाळ्यांचा गजर करीत जोरदार लाल बावटा की जय म्हणत कार्यकर्त्यांनी जय जयकार केला.
——————————————————–
सुरेश खैरे यांची बांधणी आज जिल्हयातील उरण, पेण,सुधागड पाली पाठोपाठ रोहा येथे पाहायला मिळाली. पक्षाला खंबीर नेतृत्व सुरेश खैरे आणि अतुल म्हात्रे यांचे आहे. जे गेले त्यांनी बीजेपीच्या माध्यमातून कुठलीही गंगा आणली नाही. गंगा शेकापने आणली. नेते जयंतभाई पाटील यांचे सच्चे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आज सावांद मेळाव्यातून पाहायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त करत महिलांनो अधिक सक्षम व्हा अधिक जोमाने काम करायचे आहे. 
…मानसी म्हात्रे, महिला आघाडी
——————————————————–
रायगडमध्ये पक्ष्याचा संवाद मेळावा चालू आहे. खासदारकीची निवडणूक झाली त्या नंतर लोकांची मन खचली होती. पण खवून जाऊ नका हे संवाद मेळाव्याचे मुख्य हेतू आहे. आजही पडलो असलो तरी शेकापचा मतांचा आकडा कायम आहे. तालुक्यात पैसे वाले जरी असले तरी कार्यकर्ते जागेवर आहेत. पक्षाची फळी मजबूत आहे. सामाजिक चळवळीतून आपल्या पक्षाची ओळख आहे. येणाऱ्या काळात तिसरी मुंबई म्हणुन घोषित करण्यात येत आहे त्यामुळे या तालुक्यात पुढच्या काळात आमचा भूमिपुत्र हाच व्यावसायिक बनेल त्याला उत्तम दर्जाचा रोजगाराचे काम यावर प्रयत्न केले जातील, जास्तीत जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येण्यासाठी आवश्यक आहे.
…अतुल म्हात्रे
——————————————————–
 सदरच्या संवाद मेळाव्यातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नेते शंकरराव म्हसकर म्हणाले की, शेकापचा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता आहे. कुंभाराने बनविलेल्या मडक्यात चुकून एखादा कच्चा असतो आणि तो फुटतो परंतु त्यात पुन्हा बद्दल करून उत्तम प्रकारची मडकी घडविण्याचे काम पुन्हा करू येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकित लाल बावटा फडकेल असे सांगितले.
न भूतो न भविष्य असा हा संवाद कार्यकर्ता मेळावा ठरला या संवाद मेळाव्यात तांबडी येथील उद्योजक विठोबा सितप, कार्यकर्ते वाईकर सह अनेक कार्यकर्त्यांनी शेकापत दस्तुखुद्द नेते जयंताभाई पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.तर नेते शंकरराव म्हसकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात हजारो महिला, पुरुष, तरुण यांनी उपस्थिती लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading