शिवसेना आणि राष्ट्रवादी अपात्र प्रकरण: २४ सप्टेंबरच्या सुनावणीकडे लक्ष

Court Suprim

मुंबई ( मिलिंद माने ) :

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाचे सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या 24 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी नंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात याबाबत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयात दोन दिवसापूर्वी कोर्टाच्या दैनंदिन कामकाजाच्या यादीत हे प्रकरण २२ ऑक्टोबर रोजी दाखवण्यात आले होते मात्र. या प्रकरणाबाबत अनेक महिने सुनावणी झालेली नाही येत्या २४ सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत काहीतरी निर्देश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
शिवसेना पक्ष फुटी नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. व राष्ट्रवादी काँग्रेस कुठे नंतर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या दोन नेत्यांसोबत गेलेल्या आमदारांबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र केले नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती वारंवार याबाबत तारीख पे तारीख पडत असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देऊन चिन्हाचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवावे असे लेखी पत्र देऊन सांगितल्याने अजित पवार गटात याबाबत मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली आहे त्यामुळे २४ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ चिन्ह घड्याळ हे शरदचंद्र पवार यांच्याकडून अजित पवार यांना निवडणूक आयोगाने दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या याचिकेबाबत तारीख पे तारीख पडत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ जिल्हा या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टात निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्यावे अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे शरद पवार गटाने यापूर्वी दोन वेळा हे प्रकरण न्यायालयात मेन्शन केले आहे पण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी घेतली नव्हती आता शरद पवारांनी केलेली विनंती मान्य होते का हे २४ तारखेच्या सुनावणी स्पष्ट होणार आहे
केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव तर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मूळ नाव व धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवले त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या घटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे
सर्वोच्च न्यायालयात २४ सप्टेंबर रोजी. आमदार अपात्र प्रकरणात सुनावणी झाली व या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याचा फटका अजित पवार गटाला व शिंदे गटाला बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे या निर्णयामुळे अजित पवार गट व शिंदे गटाला भाजप किती जागा सोडणार यावर देखील मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading