शिवजयंती उत्सवात सामिल व्हा : उतेखोल शिवभक्त मित्रमंडळाचे आवाहन

Shivjayanti Mangav
माणगांव ( रविंद्र कुवेसकर ) :
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथी नुसार जयंती यंदा गुरुवार दि.२८ मार्च रोजी आहे. उतेखोलगांव येथे ग्रामदैवत श्री वाकडाई देवी मंदीर ट्रस्टच्या सहकार्यातून येथील ३६ व्या वर्षात पदार्पण करणारे श्री वाकडाई देवी युवक मित्रमंडळ व छत्रपती शिवराय हिंदवी विचार मंच आणि हिंदूत्ववादी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक नितीन बामुगडे यांच्या पुढाकाराने, मावळा मराठा तसेच दूर्गवीर प्रतिष्ठानचे तरुण मित्र मंडळाच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्याने विशेष साजरी होणार आहे.
कार्यक्रमात पारंपारिक वेशभूषा, खालुबाजा, लेझिम, ऐतिहासिक मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके सादर करीत शिस्तबध्द नियोजन करुन अत्यंत पारंपारिक पध्दतीत, वाद्य गाणी यांच्या तालासुरात ध्वनीप्रदूषणाची काळजी घेत शांततेत शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना माणगांवच्या हिंदवी विचार मंचचे मुख्य संघटक शिवभक्त चिन्मय मोने यांनी मांडली असुन कार्यक्रमाची जोरदार तयारी येथे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या उत्सवात भरगच्च कार्यक्रमांची रुपरेषा; गुरुवार, दि.२८ मार्च सकाळी १० वाजता किल्ले रायगडवरुन येथील होळीच्या माळावर शिवज्योतीचे आगमन, सकाळी १०.१५ वा. शिवरायांचे मुर्तीस जलाभिषेक व दुग्धाभिषेक व पुजा-आरती होणार आहे. या नंतर सायं ४ ते ५ वा. अशोकदादा साबळे विद्यालय ते होळीचामाळ मार्गावरुन शिवरायांची भव्य पालखी मिरवणुक निघणार आहे. तसेच सायं ५ ते ६ वाजता येथे ऐतिहासिक मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके होणार आहेत.
यानंतर सायं ६.३० ते ७.३० वा. इतिहास अभ्यासक रामजी कदम यांचे शिवचरित्रपर व्याख्यान, सायं ७.३० ते ९.०० वा. छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत तुळजापूरच्या भवानी माता मंदिरातील तत्कालिन ऐतिहासिक सांकेतिक भाषेचे जाणकार यांचा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे खास आकर्षण दिवसभर गडकोटांच्या छायाचित्रांचे देखणे प्रदर्शन देखील शिवभक्तांचे दर्शनासाठी या ठिकाणी खुले राहणार आहे.
आपल्या अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमीत्त मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन करण्यासाठी माणगांवकरांनी या उत्सवात आवर्जुन सहभागी व्हावे असे आवाहन तरुण मित्र मंडळींच्या वतिने करण्यात आले आहे. उत्सव पावित्र्य राखुनच विशेष मेहनतीने आदर्शवत शिवजयंती साजरी करण्याच्या हेतुनेच येथील तरुणाई जोरदार तयारीला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading