पेण पोलीस ठाणे हद्दीत शनिवार, दिनांक 29 मार्च 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, गुढीपाडवा, रमजान ईद, राम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर पेण शहरात रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पेण, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, खान मोहल्ला जामा मस्जिद, महावीर मार्ग, खाटीक मोहल्ला मज्जिद, पेण बाजारपेठ, पेण एसटी स्टँड, नगरपालिका नाका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मार्गांवर पार पडला.
तसेच, सकाळी 10.00 ते 10.30 या वेळेत SDPO कार्यालय पेणच्या प्रांगणात दंगा काबू योजना अंतर्गत रंगीत तालीम घेण्यात आली. या मोहिमेत पेण पोलीस ठाण्यातील 6 अधिकारी, 22 पोलीस अंमलदार, 4 होमगार्ड, पोयनाड पोलीस ठाण्यातील 1 पोलीस अधिकारी व 5 पोलीस अंमलदार तसेच वडखळ RCP प्लाटूनचे 30 जवान सहभागी झाले होते.
या रूट मार्च व दंगा नियंत्रण तालीमेमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी सण शांततेत व सुव्यवस्थेने पार पडण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.