शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा

Sharad Pawar With Paarty Addmission

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : 

निसर्ग कार्यालय पुणे येथे शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंबेडकरवादी नेते तथा कोरेगाव भीमा चौकशी आयोगातील वकील ॲड.राहुलजी मखरे (माजी राष्ट्रीय महासचिव बी.एम.पी) यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो प्रशिक्षित कार्यकर्त्यांसह जाहीररीत्या पक्ष प्रवेश केला.
आंबेडकरवादी नेते ॲड.राहुल मखरे गेल्या ३५ वर्षापासून शिव फुले शाहू आंबेडकर विचार बहुजन समाजामध्ये प्रस्थापित करण्याचे काम करत आहेत तसेच सक्रिय समाजकारणासोबत सक्रिय राजकारणामध्ये देखील राष्ट्रीय स्तरावरती बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव पदावरती देशभरामध्ये बहुजनांचे राजकारण यशस्वी करण्यासाठी संघर्ष करत होते.
ॲड.राहुल मखरे यांच्या व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) यांना आगामी विधानसभा, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फायदा होणार आहे.
ॲड.राहुल मखरे यांच्या नेतृत्वामध्ये व मा.संतोषभाई घरत (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एस.पी), मा. बाळासाहेब मिसाळ पाटील (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एस.पी) यांच्या मार्गदर्शनामध्ये बाबजी नाना भोंग, महावीर वजाळे (माजी प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी युवा मोर्चा), मा.राजकुमार धोत्रे (अध्यक्ष अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना पश्चिम महाराष्ट्र), गौरव पनोरेकर (युवा नेते), ॲड. सुनील आवारे (माजी प्रभारी बसपा-मुंबई प्रदेश), मा.वसीमभाई सय्यद (सामाजिक कार्यकर्ते), वैशाली राक्षे (महिला नेत्या), स्वराज सोनवणे (बिझनेस मॅनेजमेंट लंडन युनिव्हर्सिटी), राज पाटील ( नवी मुंबई) यांच्यासह हजारो युवा कार्यकर्त्यांनी महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एस.पी) मध्ये प्रवेश केला आहे. या प्रसंगी पंढरीनाथ पाटील ( रायगड जिल्हा उपाध्यक्ष, NCP(SP) व करण भोईर ( रायगड जिल्हा सरचिटणीस , NCP(SP) हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading