महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे तयार करणार आहे. या महामार्गासाठी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील तीर्थक्षेत्रांना अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यास मदत होणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवाच्या सीमेवरील पत्रादेवी येथे संपेल. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 86,000 कोटी रुपये असून, हा महामार्ग 802 किमी लांबीचा असेल.
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील तीन प्रमुख देवींच्या शक्तीपीठांना जोडतो:
1. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई
2. तुळजापूरची तुळजाभवानी
3. नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी
परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही जोडले जाणार आहे.
महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवासाचा वेळ 18-20 तासांवरून 8-10 तासांवर येईल, तसेच देवस्थानांशी संबंधित पर्यटनाला चालना मिळून आर्थिक विकासाला हातभार लागेल. हा महामार्ग नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशीही जोडला जाणार असून, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विस्तारात मोठे योगदान देईल.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.