व्हिडीओ कॉलवर अश्लील कृत्य करणारा आरोपी नागपूरहून अटकेत – पनवेल पोलिसांची यशस्वी कारवाई

पाच कोटी रूपयांच्या सुपारी अन् मिरी चोरीतील तिसर्‍या आरोपीला अटक
पनवेल :
करंजाडे येथे राहणाऱ्या एका महिलेवर अश्लीलतेची सीमा ओलांडणाऱ्या प्रकाराची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर महिलेला तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करून आरोपी शुभम खरबे (रा. नागपूर) याने स्वतःचा चेहरा न दाखवता अंगावरील सर्व कपडे काढून अश्लील कृत्य केले. त्यामुळे संबंधित महिलेला मानसिक त्रास व लज्जास्पद अनुभव सहन करावा लागला.
महिलेने त्वरित पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविंद्र पारधी व पोलीस शिपाई पाटील यांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला. तपासात शुभम खरबे हा नागपूरमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी नागपूरला जाऊन त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली आहे. आरोपीविरोधात योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading