
वेळास आगर ( संतोष शिलकर ) :
श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येक गावात गोकुळाष्टमीचा उत्सव जोरात होत असतो लोक आनंदाने हा सण साजरा करतात. निर्विघ्न पणे वेळास येथील दोनही वाड्यांवरील श्री.कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला गुण्या गोविंदाने साजरा केला.
ढाकुमकुंम,ढाकूमकुंम,गोविंदा रे गोपाळा,यशोदेच्या तान्ह्या बाळा अशा विविध भगवान श्रीकृष्णाच्या गाण्यांच्या ठेक्यावर निघालेला वेळास ग्रामस्थांचा गोविंदा, प्रथे प्रमाणे गावकीचे प्रमुख,स्वर्गीय शिवराम विठू शिलकर यांच्या निधना नंतर व त्यांचे पुत्र बाबुराव शिलकर यांच्या निवृत्ती नंतर वारसदार पुतणे कु.ऋतुराज,कु.सौरभ आणि कु.श्रेयस ऋषिकांत शिलकर यांच्या निवास स्थानी श्री.कृष्ण जन्माष्टमी उत्त्सव सालाबाद प्रमाणे होत असतो. तर मूळ वेळास(वेळास कोंड) येथील जन्माष्टमीचा कार्यक्रम राधाकृष्ण व श्री.भैरवनाथ मंदिरात होतो.
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्”
स्वतःसाठी पहिला अपशब्द ऐकल्या नंतर समोरच्याचं शीर धडावेगळं करण्याची शक्ती असून देखील जो अजून नव्यांणव अपशब्द ऐकण्याच सामर्थ्य ठेवतो तो असतो श्रीकृष्ण,सुदर्शन चक्रासारखं शस्त्र असताना देखील जो मधूर बासरी नेहमी हातात परिधान करतो तो असतो श्रीकृष्ण,साक्षात मृत्यु सर्पाच्या फणीवर असून सुद्धा त्यावर नृत्याचा तांडव करू शकतो तो असतो श्रीकृष्ण, आणि या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात शक्ति शाली असून सुद्धा फक्त धर्मा साठी जो अर्जुनाचा सारथी बनण्या साठी सज्ज होतो तो असतो श्रीकृष्ण,सोमवार दि.२६ ऑगस्ट रोजी रात्रौ १२ वाजता श्रीकृष्ण जन्म ग्रंथवाचन श्री.जीवन रामभाऊ भाटकर, श्री.काशिनाथ भिकाजी लाड यांनी केले तर त्याचे विश्लेषण श्री.सुधाकर गणपत मुरकर यांनी केले.
ग्रंथाच्या १२४ ओवीवर श्रीकृष्णाचा जन्मकाळ होतो.मूळ वेळास येथे श्री.सूर्यकांत बिरवाडकर(शिक्षक) श्री.संतोष दिवेकर,श्री.संतोष वाजे,तुकाराम वाजे,देवेंद्र तोडणकर यांनी ग्रंथाचे वाचन केले.पाळणा गायला जातो. बाळ गोपाळांचा गोविंदा निघतो.जन्मस्थानी बांधलेली प्रथम मानाची हंडी फोडून,सकाळी प्रथम मानाच्या हंडी फोडल्या नंतर वर्ष भरात असलेले दुःखी घरातून बाहेर काढून गोविंदात सहभागी करतात. नंतर दोनही ठिकाणच्या गोविंदा या टोका पासून ते त्या टोका पर्यंत गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन श्री कृष्णाना नवस गाऱ्हाणे बोलले जातात मग हंडी फोडली जात.
या वर्षी महिला युवतीने गोविंदाचा आस्वाद घेतला,१५/२० युवतींचा एकत्रित गोविंदा हे यावर्षीचं आकर्षण होतं. दुसऱ्या दिवशी ग्रामदैवत श्री. काळभैरव मंदिरात अखंडीत हरिनामासह सप्ताह सुरू होतो. यावेळी श्री.भैरवनाथांच्या पाषाणावर मूर्तीरुपी मुखवटे विराजमान होतात. ग्रामस्थ श्रध्देने या सप्ताहात सामील होतात. संपन्न झालेल्या वेळास गावातील दोनही गोविंदा पथकांनी आनंदी आनंद आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला.