वेळास येथील शिमगोत्सव भक्तिमय आणि आनंदी वातावरणात साजरा

Holi Utsav Sampada
वेळास आगर (संतोष शिलकर) : 
वेळास गावच्या ग्रामस्थांच्या हाकेला धावणारा नवसाला पावणारा व पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री.काळभैरवनाथ पंचतन विभागातील एक श्रद्धास्थान,कर्ता-करविता,सर्वांचा वाली,रक्षणकर्ता,तारणहार,नाथांचा नाथ, श्री.काळभैरवनाथ सकळ जणांच्या रक्षणा ठाई उभा,अशा या ग्रामदैवतेचा होळी उत्सव हुतांशनी पौर्णिमा या शुभ-दिनी महायज्ञ,होम,अर्थात मोठी होळी.
त्या अगोदर नऊ पिले आणि दहावा होम,दुसऱ्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा अर्थात धुलीवंदन या दिवशी मंदिरातून श्री.काळभैरव पालखीत बसून होळीकडे प्रस्थांन करतात वाटेत गावातील दोन शिलकर कुटुंबातील मानाच्या घरी पालखी उतरते तिथे मानकऱ्यांच्या घरांतील सदस्यांच्या शुभ-हस्ते पूजा होते. आजू-बाजूतील घरच्या महिला येऊन पूजन करतात त्यानंतर पालखी होळीस्थानी वळते,जातांना रस्त्यांवरील घरातील महिला औक्षण करतात.
हुताशनी पौर्णिमेला लावलेल्या होमाचे पूजन करतात पालखीसह भाविक पाच प्रदक्षिणा घालून होळीच्या स्थानावर श्री.काळभैरव आपल्या सहकाऱ्यांसह विराजमान होतात. भाविकांची दर्शनाला ओढ लागते.देवाचा पहारा चालू होतो.दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा.श्री.भैरवनाथ पालखीत बसून गावात फिरतात,घरोघरी पालखी पोहचते.जय-घोष,मनोभावे पूजन,नवस,गाऱ्हाणे,अशा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा.
वेळास-आगर आणि मूळ-वेळास या दोन ठिकाणी मंगलमय वातावरणात साजरा होत असतो.या सप्ताहात मनोरंजना साठी रात्री नाटकं, गॅदरिंग,संगीत रजनी असे दर्जेदार कार्यक्रम झाले.दरम्यान डेराचा नाच (गवळी समाज) आणि राधाचा नाच(कुणबी समाज) यांचा मान असतो.डेरा नाच हल्ली काही कारणाने बंद आहे.दोनही वाड्यांवरील एकच श्रद्धास्थान,मात्र दोन ठिकाणी दोन स्थानं आणि दोन पालख्या असतात.त्याचं कार्य निर्विघपणे साजरा होत असतो.
फाल्गुन कृ.पंचमी अर्थात रंगपंचमीच्या शुभ-दिनी होळीस्थाना वरून श्री.काळभैरवाच्या दोनही पालख्या त्यांच्या वरील असंख्य गाण्यांच्या ठेक्याच्या,चालींवर
होळी शेलवून डीजेच्या तालावर वाजत,गाजत,आनंदात दोन मंदिरात पोहचतात आणि दोनही पालखिंचा समारोप अत्यंत उत्साहात व भक्तिमय आणि आनंदी वातावरणात होतो.तसा याही वर्षी मूळवेळास आणि आगर वेळास येथील शिमगोत्सव अतिशय भक्तिमय आणि आनंदी आनंदात हा सण,हा उत्सव अर्थात शिमगा साजरा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading