विश्वास बसणार नाही पण हे खर आहे. सफाई कामगारांचा पगार तब्बल ५० हजार रुपये झाला आहे. केलॉग्स इंडिया प्रा.लि या कंपनीतील सफाई कामगारांना अत्ता चक्क ५० हजार रुपये पगार मिळणार आहे, हि किमया आहे न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची. हजारो रूपये पगार वाढ झाल्याने २०२४ चा दसरा या कंपनीच्या कामगारांसाठी गोड झाला आहे.
महेंद्रशेठ घरत अध्यक्ष असलेल्या न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटने विशेष प्रयत्न करून कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. तळोजा येथील केलॉग्स इंडिया प्रा.लि. व रविडायवेअर कं. लि., या कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचे करार करण्यात आले. केलॉग्स इंडिया प्रा.लि या कंपनीतील सफाई कामगारांना ३ वर्षासाठी ९२०० रुपये पगारवाढ करण्यात आली.
या पगारवाढीमुळे सफाई कामगारांचा पगार तब्बल ५० हजार रुपयांवर गेला आहे. तर रविडायवेअर कं. लि या कंपनीतील ऑपरेटर्स साठी ११५००रुपये तर कामगारांसाठी १११०० रुपयांची पगारवाढ करण्यात आली आहे. या पगारवाढीनुसार या कामगारांचा पगारही ५० हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या करारनाम्यावर न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेतर्फे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी केलॉग्स कंपनीतर्फे प्लॅन्ट मॅनेजर चंद्रकांत पवार, प्लॅन्ट एच. आर. मॅनेजर अमरजित कुमार, एच. आर मॅनेजर प्रमोद वाडकर, एस. के. एन्टरप्रायजेसचे संकेत खानावकर, अक्षय भोईर, कामगार प्रतिनिधी भगवान डोंगरे, प्रकाश फडके, मारुती पाटील, मोहन फडके, दिलीप पोरजी आदी उपस्थित होते. तर रविडायवेअर कं. लि तळोजा कंपनीतर्फे डायरेक्टर विकास सरोगी, एच.आर चे आशिष कुमार तर कामगार प्रतिनिधी वसंत मुंबईकर, जयदास गोंधळी, संतोष म्हात्रे आदि उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.