विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती अन् पक्षप्रवेश सोहळयाला उदंड प्रतिसाद

bharat-gogavle
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : येत्या काही दिवसांत मंत्रीपद मिळेल आणि त्यानंतर विजयी चौकारही मारणार असून आमदारकीच्या काळात केलेल्या विकासकामांमुळेच जनतेचे प्रेम मिळत असल्याचे भावूक उदगार महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले.
पोलादपूर तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि शिवसेना पक्षप्रवेश सोहळयाप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला जिल्हा संघटिका निलीमा घोसाळकर, तालुका संपर्कप्रमुख माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, यशवंत कासार, संजय मोदी, संदेश कदम, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, निलेश अहिरे, सुरेश पवार, अनिल पवार, अंकुश सकपाळ आदी पदाधिकारी व मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी आ.गोगावले यांनी यंदा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा शिवराजधानी रायगड येथे आयोजित करण्यात येणार असून यानिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या सोहळयाच्या पहिल्यादिवशी वाढदिवस असल्याने व्यस्त असणार असे सांगून मोठया संख्येने रायगडावर येण्याचे आवाहनही केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी गेल्या काही वर्षांपासून पोलादपूरचा मतदार हा भरतशेठकडे आकर्षित होत असला तरी कार्यकर्ते हे ठेकेदार झाल्याने त्यांनी पक्ष संघटनेसाठीदेखील वेळ देण्याची गरज व्यक्त केली.
महिला जिल्हा संघटिका निलीमा घोसाळकर यांनी आपण गोळेगणी येथील माहेरवाशिण असून पोलादपूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आवर्जून सांगितले.
माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी, आ.गोगावले यांना बाटलीमध्ये बंद करण्याची भाषा करणारे नेते तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एकटेच दिसून आले. त्यांना आमदारांना बाटलीत बंद करण्यासाठी मांत्रिक शोधायचा होता की बाटली भेटत नव्हती अशी उपहासपूर्ण टीका करून पोलादपूर तालुक्यातील गैरसोयींवर सातत्याने लिहिणारे पत्रकार शैलेश पालकर यांनी महादेवाचा मुरा येथील दूर्गमतेवर लिहिल्यानंतर तेथे डांबरीकरणाचा रस्ता पोहोचविण्याचे काम आ.गोगावले यांनी केले. माजीमंत्री प्रभाकर मोरे यांच्याप्रमाणेच तालुक्यातील अनेक प्रश्न आ.गोगावले यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास गेले कारण जसे मोरे हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींचे निकटवर्ती होते तसेच आ.गोगावले हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असल्याने गेल्या सहा महिन्यांमध्ये सुमारे 200 कोटींची कामे आणण्यात यश आल्याचे सांगितले.
याप्रसंगी आ.गोगावले, महिला जिल्हा संघटिका निलीमा घोसाळकर तसेच जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्याहस्ते पोलादपूर तालुका महिला संघटिका पदी सुवर्णा संदेश कदम यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सतीश शिंदे उपतालुकाप्रमुख, कोतवाल विभागप्रमुखपदी अविनाश शिंदे, उपविभागप्रमुखपदी ज्ञानेश्वर मोरे व विलास पार्टे, कोंढवी विभागप्रमुखपदी श्रीराम गायकवाड, उपविभागप्रमुखपदी उमेश मोरे व विलास उतेकर, देवळे विभागप्रमुख रविंद्र केसरकर यांना नियुक्तीची पत्रं व पुष्पगुच्छ देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्याहस्ते केक कापून आ.गोगावले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पोलादपूर शहरातील प्रसाद इंगवले यांच्या प्रभागातील मुस्लीम बांधव, वझरवाडीतील काँग्रेस कार्यकर्ते गोविंद पवार आणि ग्रामस्थ महिला-पुरूष, तुर्भे खोंडातील कार्यकर्ते, देवळे येथील काँग्रेस कार्यकर्ते तसेच तालुक्यातील अनेक भागातील ग्रामस्थ महिला पुरूषांनी शिवसेनेमध्ये जाहिर प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading