विनापरवाना (टेन्ट) तंबूमुळे हॉटेल व्यवसाय धोक्यात : माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आक्रमक

विनापरवाना (टेन्ट) तंबूमुळे हॉटेल व्यवसाय धोक्यात : माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आक्रमक
माथेरान (मुकुंद रांजणे ) :
माथेरानमध्ये हाॅटेल व इतर ठिकाणी अनधिकृतपणे विनापरवाना तंबु (टेंट)  लावुन मोठ्या प्रमाणात पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली जाते.अशीच परिस्थिती बहुतांश हॉटेलमध्ये झाल्यास परवाना धारक हॉटेल मालकांना ह्याची आर्थिक झळ सोसावी लागणार असून इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊन ज्या ज्या हॉटेलमध्ये अशाप्रकारे तंबू लावून व्यवसाय सुरू केले आहेत ते ताबडतोब बंद करावेत यासाठी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेऊन येथील अधीक्षक कार्यालयात जाऊन अधिकारी वर्गाला दि.१६ रोजी लेखी निवेदन सादर केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखिल शिंदे, आदेश घाग, वसंत कदम, मुकुंद रांजणे यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.
मनोज खेडकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, माथेरान पर्यावरण संवेदनशील क्षेत्र सनियंत्रण समितीने, अशा प्रकाचे टेंट वापरण्यास परवानगी दिलेली नाही.
अलेक्झांडर हाॅटेल व अशोक हाॅटेल या दोन्ही मिळकती हेरिटेज यादीमधे समाविष्ट आहेत. अशाप्रकाचे ‘टेंट’, हाॅटेलमधील पर्यटक गिर्‍हाईकांना भाड्याने देण्यासाठी हेरिटेज कमीटी व नगरपरिषदेकडून रीतसर परवानगी घेतलेली नाही. तरीही शेकडो टेंट पर्यटकांना उपलब्ध करुन अनधिकृतपणे हे व्यवसाय सुरु आहेत. विकएन्ड व सुट्ट्यांमधे या दोन्ही  हाॅटेलमधे प्रत्येकी दोनशे ते अडिचशे टेंट लावले जातात. व व्यवसाय केला जातो. त्यामुळे या प्रत्येक हाॅटेलमधे त्याकाळात ३०० ते ५०० लोक मुक्कामास असतात.
५०० लोकांच्या क्षमतेसाठी आवश्यक मलनिस्सारण प्रक्रीया केंद्र या दोन्ही ठिकाणी कार्यान्वीत नाहीत. त्यामुळे सदर ड्रेनेज हे लगतच्या वनखात्याच्या जागेत सोडले जाते. त्यामुळे ही जमीन प्रदुषीत होत आहे. त्याचा थेट परिणाम झाडांच्या ‘लाईफ स्पॅनवर’ होत आहे. अनेक झाडे सुकत आहेत किंवा अशक्त झाल्यामुळे पडत आहेत.
 माथेरानमधील वन हे ३ – ५ स्तरीय वन आहे. ज्यामधे मोठ्या वृक्षांपासुन छोट्या झुडपांचा समावेश होतो. टेंट लावण्यासाठी  अनेक छोट्या झाडांची व झुडपांची मोठ्या प्रमाणात कत्तल करावी लागते. व फक्त यातील एकच स्तर जीवंत ठेवला जातो.  अन्यथा ती छोटी झाडे मोठ्या वृक्षांच्या स्वरुपात वाढु शकतात. ही पर्यावरणाची मोठी हानी आहे.
या प्रमुख दोन हाॅटेलमधे मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी पर्यटक भरल्यामुळे पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन यावर प्रचंड ताण पडत आहे. परिणामी आजुबाजुच्या भागात पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होत असतो. तसेच घनकचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. टेंट परिसरात प्लॅस्टीकचे प्रदुषण वाढले आहे, ड्रेनेज व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्यामुळे दुर्गंधी वाढली आहे.
या हाॅटेल्समधे वाढणार्‍या पर्यटकांची संख्या व वाढलेला व्यवसाय दिसुन आल्यामुळे, अनेक हाॅटेल्स व बंगले मालक या ‘टेंट कॅंपींग’ व्यवसायाकडे आकृष्ट होत आहेत.माथेरान हे मुंबई महानगर परिक्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात राहण्याची व्यवस्था उपलब्ध झाल्यास येथील वनराईचा / जंगलांचा नाश होईल. येथील पर्यावरण धोक्यात येईल.
 माथेरानची स्वयंनिर्भर अर्थव्यवस्था व इको सिस्टीम या ‘टेंट कॅंपींगमुळे’ धोक्यात आली आहे. येथील छोटे लाॅजींग  व ‘होम स्टे’ व्यवसाय धोक्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरीक देशोधडीला लागेल.
—————————————————
‘टेंट कम्पींग’ व्यवसाय हा माथेरान शहराच्या पर्यावरणास व अर्थव्यवस्थेस हानीकारक आहे. त्यामुळे तातडीने त्यावर बंदी आणावी व भविष्यात पुन्हा असे प्रकार होऊ नयेत याकरीता स्पष्ट व कडक नियम बनवावेत.असे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading