मुंबई ( मिलिंद माने ) :
राज्यातील १५ व्या विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत असून या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसहित महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रीय काँग्रेस चे सर्वजण निवडणुकीच्या कामाला लागले असून जागा वाटपामध्ये शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व ,उत्तर महाराष्ट्र. या जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघावर टार्गेट केल असून विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचे पुणे हे केंद्रबिंदू राहणार असून पुण्यातूनच शरद पवार राज्याच्या विधानसभा निवडणुकीची सूत्र हलविणार आहेत.
राज्यात नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सत्ताधारी केंद्रातील भाजपा पक्षाचे निवडणुकीचे मुख्य केंद्र दिल्ली व नागपूर राहणार आहे तर महायुती मधील शिवसेना शिंदे गटाचे मुख्य केंद्र हे ठाणे असणार आहे तर अजित पवार गटाचे मुख्य केंद्र हे देखील पुणे असणार आहे तर महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुख्य केंद्र हे मुंबई मातोश्री असणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे मुख्य केंद्र हे पुणे तर राष्ट्रीय काँग्रेसचे निवडणुकीचे मुख्य केंद्र हे दिल्ली असणार आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघा. पैकी शरद पवार हे किमान८० जागा लढवणार असून. त्यातील शरद पवारांनी निवडून येणाऱ्या हमखास अशा ६५ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पुणे ,सातारा, सांगली ,कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, संभाजीनगर ,नाशिक, वर्धा नागपूर ,हिंगोली ,जालना, वाशिम ,बुलढाणा, गडचिरोली. ठाणे ,मुंबई, पालघर या जिल्ह्यातून मराठा समाजाच्या मतांवर निवडून येणाऱ्या मतदार संघावर शरद पवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे . विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य केंद्र हे पुणे असणार आहे पुणे जिल्ह्यातून शरद पवार हे राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांवर लक्ष केंद्रित करणारा असले तरी. पुणे जिल्ह्यातून चार तासात संभाव्य जिल्ह्यात असणाऱ्या उमेदवारांपर्यंत पोहोचण्याची नामीशक्कल शरद पवार यांनी आखली आहे. साधारणता शरद पवार यांना पुण्यातून ज्या जिल्ह्यात सभा घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी जाणे पुणे येथून त्यांना शक्य होणार आहे अशा दिवसाला तीन ते चार सभा शरद पवार घेणार असल्याचे बोलले जात आहे त्या दृष्टीने त्यांनी विधानसभा निवडणुकीची व्ह्यूव रचना आखण्यास सुरुवात केली आहे मात्र त्याच पूर्णपणे केंद्रबिंदू हे पुण्यातच असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे विधानसभा निवडणुकीसाठी 80 जागा लढवण्याच्या तयारीत असले तरी७० /७५ जागांवरती उमेदवार निवडून आणण्याची रणनीती शरद पवार यांनी पूर्णपणे नियोजन बद्द आखली असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे.
गद्दारी रोखण्यासाठी तरुणांना उमेदवारी
शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर वर्षभराने तोच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडला याला मुख्य कारण तीन टर्म निवडून येणारे आमदार दोन टर्म निवडून येणारे आमदार हे पक्ष म्हणून आपली मालकी समजायला लागले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तुच्छ समजायला लागले याचे परिवर्तन गद्दारीत झाले दोन टर्म व तीन टर्म विधानसभेत निवडून येणाऱ्या आमदारांनी गद्दारी केली त्याचे परिणाम शिवसेना पक्षासहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोगावे लागले व राज्यातील सत्तेतून पायउतार व्हावे लागले याची खंत उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवारांना असल्याने त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत. नवोदित तरुणांना उमेदवारी देण्याचे धोरण शरद पवार यांनी ठरवल्याचे बोलले जात आहे.