विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे अलिबाग येथे रूट मार्च

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे अलिबाग येथे रूट मार्च
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 
आगामी विधानसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात अलिबाग पोलिस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग उप विभागीय अधिकारी विनीत चौधरी, अलिबाग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या उपस्थितीत रूट मार्च काढण्यात आला.
तीस दिवसावर आलेल्या लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघात बुधवारी पोलिसांनी रुट मार्च आणि पथसंचलन केले. जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रूट मार्च व पथसंचलन करण्यात आले. यावेळी स्वता चालत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे या पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनिता चौधरी, अलिबाग पोलिस निरीक्षक किशोर साळे आदी उपस्थित होते.
विधान सभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने सायंकाळी अलिबाग विधानसभा मतदार संघात अलिबाग शहरातील बालाजी नाका येथून सुरुवात झाली. हा रुटमार्च पोस्ट ऑफिस ऑफीस, पापाभाई पठाण चौक, बाजारपेठ, जामा मशीद, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठिकरुळ नाका, शेतकरी भवन, रिक्षा स्टँड , अलिबाग एस टी स्टँड महाविर चौक, मारूती नाका, आय बीआय बॅंक कार्यालय असा घेण्यात आला तसेच थळ ग्राम पंचायत हद्दीत रुट मार्च घेण्यात आला.
यासाठी 15 अधिकारी आणि 100 कर्मचारी, एस.ए.पी त्रिपुरा प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, होमगार्ड हजर होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व जनतेला व्यवस्थितरित्या मतदान करता यावे, भयमुक्‍त वातावरणात, शांततेत आणि सुरळीत ही निवडणूक पार पडावी यासाठी बुधवारी अलिबाग शहरामध्ये पोलिस रूट मार्च आणि पोलीस संचलन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

रूट मार्चमध्ये असा होता लवाजमा…

पोलीस दलाची ताकद दाखविण्यासाठी काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये अलिबाग उप विभागीय अधिकारी- अलिबाग पोलिस निरीक्षक, वडखळ आरसीपी प्लाटून चे तीस अंमलदार, सी एस आय एफ चे दोन अधिकारी आणि पन्नास अंमलदार अलिबाग पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी ,दामिनी पथक दोन महिला अंमलदार. सदर रूट मार्चमध्ये समाविष्ट केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली.
——————————————————
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असून, नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी ठाणे नगर पोलिसांनी शुक्रवारी ‘रूट मार्चचे आयोजन केले होते. नागरिकांनी निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा,.
…सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading