पाणी सोडण्याचे मशिन चालू करण्यासाठी इलेक्ट्रीक बोर्डाचे बटन चालू करत असताना शॉक लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे.
रामेश्वर निशाद (55) हा पाणी सोडण्याचे मशिन चालू करण्यासाठी बेसमेंटमध्ये गेला असताना तेथे असलेल्या इलेक्ट्रीक बोर्डाचे बटन चालू करण्यासाठी गेला असता त्याला इलेक्ट्रीक करंटचा शॉक लागल्याने तो बेशुद्ध झाला.
तातडीने त्याला दवा उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.