आजच्या युगातील परिस्थितीमुळे मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित न ठेवता समाजाने त्यांच्या शिक्षणासाठी योगदान देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत दि अण्णासाहेब सावंत को.ऑप अर्बन बँकेच्या चेअरमन शोभा सावंत यांनी व्यक्त केले. होप फाउंडेशनच्या सुकन्या योजनचा शुभारंभ शोभा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन नरेंद्र महाडीक यांचे निवासस्थानी करण्यात आले होते. सदर कार्यम्रास दि अण्णासाहेब सावंत को.ऑप.अर्बन बँकचे चेअरमन शोभा सावंत, कोमसापचे रायगड जिल्हयाध्यक्ष सुधीर शेठ, ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, कोमसाप जिल्हा समन्वयक अ.वि.जंगम सर, दि अण्णासाहेब सावंत को.ऑप.अर्बन बँकचे संचालक उदय बहुलेकर, कोमसाप महाड शाखा अध्यक्ष गंगाधर साळवी, होप फाऊंडेशनच्या सेक्रेटरी प्रियांका नरेंद्र महाडीक, रोहिदास तरूण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रविण चांदोरकर, उद्योजक संजय जगताप, आई सुकन्या योजनेच्या प्रमुख विजयालक्ष्मी जगताप, मिलन बहुलेकर, ज्योती खेडेकर, मुग्धा सागवेकर तसेच अक्षरशिल्पचे तज्ञ मार्गदर्शक चंदन तोडणकर प्रोजेक्ट मॅनेजर आदित्ये कासरूंग आदी मान्यवर उपस्थित होते.
शोभा सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले की, आजच्या विद्यार्थिनींच्या शिक्षणात आपले योगदान महत्त्वाचे आहे. होप फाउंडेशन उत्कृष्ट कार्य करू शकते असा विश्वास व्यक्त करत त्यांनी तालुक्यातील 1000 सुकन्यांमध्ये होणाऱ्या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला. होप फाउंडेशनच्या टीम यशस्वीपणे पुढे जात आहे आणि गरजू विद्यार्थिनींसाठी ही योजना वरदान ठरेल. शैक्षणिक साहित्याची मदत देणे हे या योजनेंतर्गत अपेक्षित आहे.
होप फाउंडेशन शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असून अनेक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये वही, पुस्तके, युनिफॉर्म, शालेय फी, हॉस्टेलिंग फी, इ. स्वरूपात मदत करण्यात आली आहे, असे सुधीर शेठ यांनी आपल्या मनोगतात आवर्जून सांगितले.
समाजाने शिक्षणासाठी मदत करणे ही काळाची गरज आहे. होपच्या कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले. नरेंद्र महाडीक यांचे कार्य विद्यार्थिनींसाठी खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी केले.तर जंगम सर यांनी या योजनेची व्याप्ती अधोरेखित केली.
सुकन्या दत्तक पालक योजना ही होप फाउंडेशन संस्थेच्या वतीने राबविली जाणार असून, 500 सुकन्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप या शैक्षणिक वर्षात करण्यात येईल. सुमारे 30 शाळांसह 5 जुनिअर व 2 सिनियर कॉलेज मध्ये ही योजना राबविण्यात येणार असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे व या उपक्रमात आर्थिक योगदान द्यावे. तसेच महिलांनी आईचा डब्बा घेऊन या सुकन्यानच्या शिक्षणा करिता सहकार्य करावे असे आवाहन नरेंद्र महाडीक यांनी केले.
महाड परिसरातील होप फाउंडेशन ही संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत असून या उपक्रमात आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे हे होपच्या सेक्रेटरी प्रियांका नरेंद्र महाडीक यांनी सांगून आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश कंक यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ऑफिस मॅनेजर अरूंधती मुतालिक, क्रिएटीव्ह हेड निशांत यांनी मोलाचे योगदान दिले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.