कर्जत-खालापूर तालुक्यात सुधाकर घारेंचा झंझावात पुन्हा दिसून आला आहे. कर्जत मधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कर्जत आणि खालापूर तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी सुधाकर घारेंच्या कामावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुधाकर घारेंनी दोन्ही तालुक्यात कामाचा झंझावात दाखविण्यास सुरुवात केली आहे. खास करून आदिवासी बहुल भागात कामे केल्यामुळे त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवत खालापूर तालुक्यातील आत्कर गाव, गोरठण, ढेकू, साजगाव कर्जत तालुक्यातील बामचा मळा, खांडा नेरळ, कोठिंबे, कराळे वाडी, शिलार वाडी, गावंड वाडी येथील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. पुढील एक महिन्यात विधानसभा लागण्याची शक्यता असल्याने या प्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढलेले पोलीस मित्र संघटनेचे किशोर शितोळे यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने सुधाकर घारेंचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.
या पक्ष प्रवेशावेळी किशोर शितोळे म्हणाले की, कोणतेही पद नसताना सुधाकर घारेंनी आदिवासी बहुल भागात निस्वार्थी पणे कामे केली आहेत. तरुणांच्या रोजगारासाठी ते धावून येत आहेत. या त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन आम्ही प्रवेश केला आहे. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे विद्यमान आमदार यांचे टेन्शन वाढल्याचे कर्जत मधून बोलले जात आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.