विचाराची मशाल पेटणार विरोधकांची झोप उडणार : स्नेहल जगताप

विचाराची मशाल पेटणार विरोधकांची झोप उडणार : स्नेहल जगताप
सांदोशी खोऱ्यातील बहुतांश विकास कामे स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या काळातील : सुभाष मोरे
महाड ( मिलिंद माने ) : 
महाड तालुक्यातील सांदोशी व आमडोशी गावातील नागरिकांनी स्व. मा आमदार.माणिकराव जगताप यांनी त्यांच्या कारकीर्द मध्ये केलेल्या विकास कामांची पोच पावती म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांच्या विचारावर प्रेरित होऊन रविवारी सुट्टीचे औचित्य साधत स्नेहल जगताप यांच्याशी संवाद करत पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना सुभाष मोरे यांनी स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या काळातच सांदोशी खोऱ्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. विरोधकांनी कितीही थापा मारल्या तरी या गावातील असंख्य ग्रामस्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही ग्रामस्थांनी यावेळी दिली.
यावेळी आजचा संडे पक्ष प्रवेशाचा सुपर संडे झाला असून तालुक्यातील अनेक गावाचे पक्ष प्रवेश झाले असून विचारांची मशाल पेटणार विरोधकांची झोप उडणार असल्याचे प्रतिपादन१९४. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार*स्नेहल माणिकराव जगताप यांनी केले.
या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार उमेदवार स्नेहल. माणिकराव जगताप , महाड विधानसभा नेते हनुमंत जगताप, विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे ,तालुका प्रमुख आशिष फळसकर, तालुका संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख ,जिल्हा वाहतूक सेना प्रमुख सुभाष मोरे, राजुशेठ कोरपे,सरपंच चैतन्य म्हामुणकर,विभाग प्रमुख किशोर सर्कले, विभाग प्रमुख निलेश धुमाळ, तालुका युवासेना अधिकारी प्रफुल धोंडगे,राजू मोरे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना सुभाष मोरे यांनी मशाल ही विचाराची मशाल आहे विचार घेऊन प्रचार करत ती या निवडणुकीत मतपेटीतून प्रज्वलित करत परिवर्तनच्या लाटे मध्ये सामील होत उमेदरवार स्नेहल जगताप यांना बहुमताने निवडून द्यायचे आहे. स्व माणिकराव जगताप यांच्या माध्यमातून या गावातील रस्ता, सभामंडप, पाणी योजना सह इतर कामे योजना मार्गी लावल्या होत्या मात्र गेल्या 15 वर्षात आमदार यांनी कोणत्याही प्रकारचा विकास या भागात केला नाही ना या भागातील समस्या सोडविल्या. त्याच्या भूलथापा ना बळी पडत काहीजणांनी पक्ष प्रवेश केला. मात्र तो निष्क्रिय ठरला असून संपूर्ण गावा सह तरुण मंडळी चाकरमानी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार व निष्ठेवर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश करत स्नेहल जगताप यांना मत्याधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त करत असल्याचे मोरे यांनी बोलताना सांगितले गावातील 80 टक्के ग्रामस्थ सोबत असून आगामी काळात विरोधक शिल्लक राहणार नसल्याचे सांगत संपूर्ण गाव शिवसेनामय होणार आहे असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला.
यावेळी बबन डावले, विनोद हिरवे, एकनाथ होगाडे, सचिन होगाडे, रामचंद्र होगाडे, बाळाराम ढेपे, आशिष डावले, सतिष डावले, अमित डावले, अजय हिरवे, सुरेश हिरवे, मानू हिरवे, अनिल हिरवे, कोंडीराम होगाडे, लक्ष्मी होगाडे, दर्शन हिरवे, मनिष चव्हाण, शिवाजी गोरे इत्यादी प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading