विकासासाठी तरुण पिढीनं झोकून देत काम करावं : आ.प्रवीण दरेकर

Pravin Darekar
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
उत्सवांसोबतच आपल्या गावाचा, परिसराचा, पंचक्रोशीचा विकास झाला पाहिजे. यासाठी सगळया तरुण पिढीने झोकून देऊन काम केले पाहिजे, असे आवाहन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. ते पोलादपूर येथील कापडे बुद्रुक गावी साईनाथ मित्र मंडळ कापडे बुद्रुक माळवाडी तर्फे आयोजित केलेल्या साईभंडाराप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपाचे स्थानिक नेते प्रसन्ना पालांडे, नारायण साने, हरीश्चंद्र पवार यांसह साईनाथ मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ.दरेकर म्हणाले की, मला आनंद आहे. मीही साईभक्त आहे. साईनाथांच्या वातावरणात यायला मलाही आनंद होतो. आपल्या सर्वांच्या व साईंच्या कृपेने राज्यभरात, विधिमंडळात काम करण्याची जबाबदारी मला मिळाली आहे. राज्यभर काम करत असताना पोलादपूर तालुक्याकडेही माझे बारीक लक्ष असते. येथील विकासाचे जे प्रश्न असतात ते प्रामाणिकपणे लक्ष घालून सोडविण्याचा मी प्रयत्न करतो. पोलादपूर तालुका हा पूर्णपणे मागासलेला आहे. सर्व तालुक्यांचा सर्वांगीण विकास झाला. परंतु पोलादपूर तालुक्याचा ज्या पध्दतीने विकास व्हायला पाहिजे होता, प्रकल्प यायला पाहिजे होते ते दुर्दैर्वाने झाले नाही. त्यामुळे तरुणांनी यामध्ये सहभागी झाले पाहिजे. तुम्हाला जी मदत लागेल ती सर्व आपल्या पाठीशी उभी करू, असे आश्वासन आ. प्रवीणभाऊंनी यावेळी दिले.
साखरच्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटर कंपनीला आवश्यक तो अर्थपुरवठा करणार
तालुक्यातील उद्योजकता वाढीसाठी नवीन कारखानदारी सुरू करणाऱ्यांना त्यांच्या प्लांटसाठी आवश्यक तो अर्थ पुरवठा करणार, अशी ग्वाही मुंबै बँकेचे चेअरमन आणि भाजपा विधानपरिषदेतील गटनेते आ.प्रवीणभाऊ दरेकर यांनी दिली. याप्रसंगी भाजपचे पोलादपूर तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपाचे स्थानिक नेते प्रसन्ना पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मिनेरल वॉटर प्लांटचे उद्योजक चोरगे यांनी या कारखान्यातील उत्पादनाची माहिती आ.दरेकर यांना दिली.
पोलादपूर येथे श्रीकाळभैरवनाथ देवस्थानच्या संपूर्ण सौंदर्यीकरणासाठी 50 लाख : आ.प्रवीणभाऊ दरेकर
पोलादपूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीकाळभैरवनाथ देवस्थानच्या संपूर्ण सौंदर्यीकरणासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी 50 लाखांच्या निधीची तरतूद आपण करण्याचा शब्द दिला असून त्याची पूर्तता तातडीने करण्याचे प्रयत्नही केले असल्याने दिलेला शब्द पूर्ण करण्याची भुमिका पोलादपूरचा भुमिपुत्र म्हणून आजही कायम असल्याचे मत,  आ.प्रवीणभाऊ दरेकर यांनी पोलादपूर येथील भैरवनाथनगर सहाणेवर ग्रामदैवतांच्या आगमनानंतर पालखीतील श्रीदेव काळभैरवनाथ, श्रीजोगेश्वरी व श्रीदेव रवळनाथांचे दर्शन घेऊन व्यक्त केले.
यावेळी मुंबै बँकेचे चेअरमन आणि भाजपा विधानपरिषदेतील गटनेते आ.प्रवीणभाऊ दरेकर यांचा देवस्थानतर्फे अध्यक्ष बाबूराव महाडीक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपाचे स्थानिक नेते प्रसन्ना पालांडे, राजन धुमाळ, निलेश चिकणे, एकनाथ कासुर्डे, महेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.दरेकर यांच्यासोबत उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्रीकाळभैरवनाथ देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading