पनवेल परिसरात तसेच इतर ठिकाणी वाहन चोरीसह मोबाईल चोरी करणार्या सराईत दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ अपार्टमेंट, ओम ट्रेडर्स दुकानासमोर, डेरवली गाव येथे उभी करून ठेवलेली महिद्रां कंपनीचे पिकअप क्रं एम.एच 46 ई 3950 ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी करून नेली म्हणुन पिकअप मालकानी दिलेल्या तक्ररीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्हयाचा तपास तसेच चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने पनवेल पोलिस पथकाने कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्हयाचा तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे गुन्हयाचा सखोल व कौशल्यपुर्ण तपास करून सदर गुन्हयातील 2 आरोपींना निष्पन्न केले त्यामध्ये आरोपी कौशल पाटील व रणजित रामप्रकाश सोनी यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
अधिक चौकशीमध्ये अजूनही वाहने व इतर मुद्देमाल पोलीस हस्तगत करतील असा विश्वास तपास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हे आरोपी गुन्हे करून अटक झाल्यावर शिक्षा भोगून पुन्हा याच मार्गाचा अवलंब करतात व आतापर्यंत जवळपास 16 गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सदर आरोपींना दि. 7/02/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.