अलिबाग-पेण मार्गावर असणाऱ्या पोयनाड नाक्यावर रिक्षा चालक मालकांना शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी वाहतूक सप्ताह निमित्त वाहतूक नियमांचे बाबत माहिती देण्यात आली. सदर माहिती रिक्षा चालक मालक संघटनाचे उपाध्यक्ष जयेंद्र म्हात्रे , खजिनदार, सेक्रेटरी, तसेच युनियनचे पदाधिकारी हजर होते त्यांना वाहतुकीच्या नियमाबाबत तसेच नवीन नियमांचे दंड आकारणी बाबतची माहिती दिली.
रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अप्पर पोलीस अधीक्षक विजय शिवतारे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले व रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीचे नियम सांगून वाहतुकीच्या नियमांचे पत्रक वाटण्यात आले.
दररोज होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखा नेहमीच सक्रीय असते विशेष म्हणजे पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीचा ग्रामीण परिसर याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामध्ये शनिवार, रविवार अलिबाग, मुरुड कडे पर्यटक मोठ्या संख्येने येतात अशा वेळी वाहतूकोंडीमुळे सर्वांना त्रास सहन करावा लागतो जर आपण वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात घडणार नाहीत अशी ग्वाही यावेळीआपले मनोगत व्यक्त करताना पोलीस सहाय्यक फौजदार गोरख लवटे ,पोलीस हवलदार नित्यानंद पवार, वेदिका पेडवी यांनी सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.