वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या प्रोडक्ट्स शाँपीचा शानदार शुभारंभ

Vishisht Dairy

आंगवली ( संदीप गुडेकर ) : 

चिपळूणमधील वाशिष्ठी मिल्क अँन्ड मिल्क प्रोडक्ट्स शाँपीचा संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शिवाजी चौक व साडवली सह्याद्रीनगर येथे रविवारी शानदार शुभारंभ करण्यात आला.वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन, उद्योजक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याहस्ते देवरूख येथील शाँपीचे उद्घाटन करण्यात आले.तर वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्याहस्ते साडवली सह्याद्रीनगर येथील शाँपीचे उद्घाटन करण्यात आले. वाशिष्ठी डेअरीच्या प्रोडक्ट्स शाँपी आता देवरूख व साडवली सह्याद्रीनगर येथे ग्राहकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांचा रविवारी वाढदिवस असल्याने साडवली सह्याद्रीनगर येथे बचत गटातील महिलांच्या वतीने केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
शाँपींच्या उद्घाटनप्रसंगी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, माजी राज्यमंत्री रविंद्रजी माने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, महिला तालुकाध्यक्षा दिपीका किर्वे, देवरूख शहराध्यक्ष निलेश भुवड, रेहान गडकरी, युयुत्सू आर्ते, तुरळचे माजी सरपंच शंकर लिंगायत, समीर खामकर, जनक जागुष्टे, सुजित कदम, देवरूखच्या शाँपीप्रमुख रेवा कदम, साडवली सह्याद्रीनगर येथील शाँपीप्रमुख ज्योती जाधव, गुलजार गोलंदाज, रोहन सकपाळ आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी शाँपीप्रमुख रेवा कदम व ज्योती जाधव यांना वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.
चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी हा दुग्ध प्रकल्प चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू झाला आहे. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन उद्योजक प्रशांत यादव आहेत. तर मुख्य प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव या आहेत.या उभयतांच्या उत्तम नियोजनाखाली वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचा प्रवास अतिशय चांगल्याप्रकारे सुरू आहे. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची आत्तापर्यंत ५४ दूध संकलन केंद्र असून या माध्यमातून दररोज ३५ हजार लिटर दूध संकलित केले जाते. यापैकी १० हजार लिटर दूध हे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. तर इतर दूध पाऊच पँकींगसाठी (दूध पिशवी) वापरले जाते. वाशिष्ठी डेअरीच्या सर्व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी असून या सर्व पदार्थांना ग्राहकांची उत्तम पसंती मिळत आहे. यामध्ये दूध, दही, टोन्ड मिल्क, ताक, मसाला ताक, लस्सी, मँगो लस्सी, फ्लेवर्ड मिल्क, तुप, श्रीखंड, आम्रखंड, खवा, खवा मोदक, पनीर, पेढा, मँगो बर्फी या पदार्थांचा समावेश आहे. तर लवकरच काजू कत्तलीचे प्रॉडक्ट्स निर्मिती करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading