PEN न्यूज ऑनलाइन टीम :
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन, तिला गर्भवती करणाऱ्या युवकाविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले वर्षभर तो तिचे शोषण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पेण मोतीराम तलाव राहणाऱ्या इसमाने ०१/१२/२०२३ ते ३१/१२/२०२३ या दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला व तिला नऊ महिन्यांची गरोदर केले.
याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर इसमाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर हे करीत आहेत.