कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीत बेडीस गाव अंतर्गत ९ आदिवासी वाड्या आहेत. दिनांक १६ मे २०२४ रोजी वादळाच्या तडाख्याने जि.प.शाळा,समाज मंदीरे, अंगणवाडी तसेच शेकडो घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसान झालेल्या घरांचे तहसीलदार यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत पंचनामे करून शासन दरबारी दाखल करण्यात आले आहेत, परंतु आजपर्यंत बेडीसगाव येथील आदिवासी बांधवाना नुकसान भरपाई मिळाली नाही.
वादळाने आदिवासी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही आदिवासी बांधव आज ही बेघर स्थितीत असून शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत दहा महिने उलटून तरी पण मदत मिळत नसल्याने पुन्हा आदिवासी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना तातडीने मदत मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले.
या वेळी कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ, दत्तात्रेय निरगुडा, मनोहर दुमणा, बुधाजी ढुमणा, दत्तू निरगुडा वाळकू चौधरी, योगेश सराई, नाना वाघ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————-
बेडीसगाव येथील नुकसान ग्रस्त आदिवासी बांधवांचे पंचनामे करून मदतीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवले असून लवकरच शासनाकडून मदत मिळेल.
…..धनजंय जाधव, तहसीलदार कर्जत
—————————————————-
बेडीसगाव येथील आदिवासी बांधवांना तातडीने शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आदिवासी समाज संघटना प्रयत्नशील आहे.
…परशुराम दरवडा ( अध्यक्ष आदिवासी समाज संघटना कर्जत )
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.