वाढीव मालमत्ता करा संदर्भात महाविकास आघाडीने विचारला महानगरपालिकेला जाब

baban-patil
पनवेल  ( संजय कदम ) : पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जाचक मालमत्ता कराविरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे. यासंदर्भात पनवेल- उरण महविकास आघाडीने वेळोवेळी आंदोलने ,मोर्चा , उपोषणे करून जनतेसाठी न्याय मागितला होता . परंतु भाजपप्रणित सत्ताधारी व महानगरपालिका प्रशासन जनतेला दिलासा देण्या ऐवजी नोटिसा देण्यात व मालमत्ता जप्ती करण्यामध्ये मशगुल असल्याने याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
यावेळी पनवेल- उरण महविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. आ. बाळाराम पाटील ,शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख शिरीष घरत ,महाविकास आघाडी सचिव व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील ,मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, उप जिल्हाप्रमुख रामदास पाटील , काँग्रेस तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी ,महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे , दिपक घरत,शशिकांत डोंगरे , डी . एन मिश्रा ,विश्वास पेटकर ,शांताराम कुंभारकर ,प्रवीण जाधव , यतीन देशमुख , हेमराज म्हात्रे , नारायण घरत , मा. नगरसेवक गणेश कडू ,रवींद्र भगत ,महिला आघाडीच्या निर्मला म्हात्रे ,शशिकला सिंग ,प्रीती जॉज ,श्रुती म्हात्रे ,माया अहिरे ,जी. आर. पाटील ,मल्लीनाथ गायकवाड ,सतीश मोरे ,गायकवाड सर ,गणेश पाटील ,प्रभाकर गोवारी,विश्वास म्हात्रे,शशिकांत बांदोडकर आदींनी यावेळी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेटे यांची भेट घेऊन यासंदर्भात व्यावसायिकांना मालमत्ता कराबाबत जप्तीच्या नोटिसा बजावल्याचा निषेध करण्यात आला .
जनभावनेचा आदर करून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी महविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी यावेळी केली .तसेच लवकरच महाराष्ट्राचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनांत व पुढील आठवड्यात आयुक्त गणेश देशमुख यांच्या बरोबर बैठक लावून वाढीव मालमत्ता कर रद्द काण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी मा. आ. बाळाराम पाटील यांनी केली. अन्यथा भविष्यात सर्वसामान्य नागरिक ,लहान मोठे व्यावसायिक ,सामाजिक-राजकीय संघटना व महाविकास आघाडी लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा रस्तावर उतरतील असा इशारा महाविकास आघाडी सचिव व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांनी यावेळी दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading