वाकण जवळ काॅईल घेऊन जाणा-या ट्रेलरला अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

Treller Accident

सुकेळी ( दिनेश ठमके ) :

महामार्गावर सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये जिंदाल हाॅस्पिटलच्या समोर वडखळ बाजुकडुन कोलाडच्या दिशेने काॅईल घेऊन जाणा-या ट्रेलर चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर रस्त्यावरून खाली उतरुन बाजुला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन अर्धवट स्थितीत पलटी होऊन हा अपघात घडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात. बुध.( दि.९) रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबतीत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार वडखळ बाजुकडुन पाॅस्को कंपनी माणगाव येथे काॅईल घेऊन जाणारा ट्रेलर क्रं. एम.एच.४२ बी. एक्स.९९८९ सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये जिंदाल हाॅस्पिटलच्या समोर आल्यानंतर ट्रैलर चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्यावरुन खाली उतरली व बाजुला असलेल्या खड्ड्यामध्ये अर्धवट स्थितीत पलटी झाली. या अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले असुन ट्रेलर चालकाने मात्र तेथुन पल काढला.
या अपघाताची माहीत मिळताच वाकण टॅबच्या सहायक पोलिस निरीक्षक गितांजली जगताप यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह घटनास्थळी जाऊन अपघाताची प्रत्यक्षात पाहणी करुन वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच ट्रेलर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान या घटनेची माहिती नागोठणे पोलीस यांना दिली असुन पुढील तपास नागोठणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading