पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी (ता.भोर) येथील वळणावरुन महाडकडून पुणे भोरच्या दिशेने जाणारी मारुती कंपनीची इको प्रवासी कार एम एच १२ यु जे ९९५७ घाटातील अवघड वळणावर चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने ५०० फुट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक जणजागीच ठार तर आठ जण गंभीर रित्या जखमी झाले असल्याची माहिती समजते.
सोमवार दी.२७ रोजी पहाटे चारच्या सुमारास. भोर घाटात हा अपघात झाला असून या. अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले असून सर्व पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आपघातात शुभम शिर्के (वय २२ जनता वसाहत पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर मंगेश गुजर (वय२६, दत्तवाडी), अशोक गायकवाड (वय २९ रा.भवानीपेठ), सिद्धार्थ गणधने ( वय २६ रा.दांडेकर पुल), सौरब महादे ( वय २२ रा.पर्वती), गणेश लावंडे (वय२७ रा.धायरी) अभिषेक रेळेकर (वय २५ रा.नारायण पेठ), यशराज चंद्रलोकूल (वय २२ घोरपडे पेठ) आणि आकाश आडकर ( वय २५ रा. दत्तनगर) अशी जखमींची नावे आहेत. भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री रेस्कू टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात येथे पाठविण्यात आले आहे.
भोर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राहुल मखरे, सुनिल चव्हाण, सागर झेंडे, वारवंडचे पोलिस पाटील सुधीर दिघे, स्थानिक ग्रामस्थ भाऊ उंब्राटकर, विठ्ठल पोळ निलेश उंब्राटकर,अक्षय धुमाळ, निलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहचून मदत केली. या संपूर्ण अपघाताचा पुढील तपास भोर पोलिस. ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.