वणव्याच्या आगीत झाड पडल्याने महाड विन्हेरे राज्य मार्गावर वाहतूक कोंडी!

Road Colaaps Tree
महाड (मिलिंद माने) :
महाड विन्हेरे राज्य मार्गावरील तांबडी कोंड जवळील वळणावर पुरातन वडाचे वृक्ष काल सायंकाळी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वनव्याच्या आगीत अर्धवट अवस्थेत जळून रस्त्यावर पडल्याने राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
महाड दापोली मार्गावरील तांबडी कोड जवळील वळणावर काल सायंकाळी अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर व ण वा लावल्याने वडाच्या झाड त्या आगीच्या भक्षस्थानी पडले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली मात्र या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या एफएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीने तातडीने जेसीबीच्या साह्याने हे वडाचे झाड मार्गावरून काढण्यासाठी मनुष्य बाळासह यांत्रिक यंत्रसामुग्री लावून झाड बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला असला तरी वणव्यामुळे त्याच्या बाजूला असणाऱ्या अन्य वडाच्या झाडांना देखील आगीच्या ज्वाला मुळे ती वडाचे देखील रस्त्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकंदरीत महाड तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर डोंगर खोऱ्यामधील वनसंपदा मागील महिन्याभरापासून लागणाऱ्या वणव्यांच्या आगीमध्ये नष्ट होत असताना महाड मधील वन खाते मात्र सुस्त झोपी गेले आहे. एकाही जंगलाला लागणाऱ्या वणव्यांच्या आगीवर त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही अथवा एकाही व्यक्तीवर त्यांच्याकडून आज पर्यंत कारवाई झालेली नाही यावरून खाते किती सुस्तावले हे पाहण्यास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading