वडखळ पोलीस स्टेशन आणि पेण तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू यांच्यामध्ये संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे उद्दिष्ट म्हणजे पोलीस प्रशासन आणि पत्रकार बांधवांमधील सहकार्य वृद्धिंगत करणे तसेच परस्पर संवादातून समाजातील समस्यांवर अधिक चांगले आणि परिणामकारक मार्ग शोधणे.
या बैठकीला वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर,पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते, पोलीस हवालदार अमोल म्हात्रे, पोलीस शिपाई आकाश तसेच स्थानिक पत्रकार उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी उपस्थित पत्रकारांना पोलीस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती दिली, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेले विविध निर्णय आणि उपक्रम यांवर चर्चा केली.
यावेळी पत्रकार संतोष पाटील (कृषिवल प्रतिनिधी) यांनी आपआपल्या क्षेत्रातील समस्यांचा उल्लेख करताना पोलिसांकडून अधिक पारदर्शकता आणि वेळेवर माहिती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर पत्रकार राजेश कांबळे (सकाळ प्रतिनिधी ) यांनी सांगितले की, योग्य आणि स्पष्ट संवादामुळे समाजात घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत होईल. याचबरोबर जेष्ठ पत्रकार विजय मोकल व दत्ता म्हात्रे यांनी पोलीस प्रशासनाने व पत्रकाराने त्यांचे काम करताना भेडसावणाऱ्या अडचणींवरही प्रकाश टाकला.
बैठकीदरम्यान पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय कसा अधिक चांगला होऊ शकतो यावर चर्चा झाली. एकमेकांच्या भूमिकेचा आदर करीत, पोलीस आणि पत्रकार यांनी एकत्र काम करून समाजासाठी सर्वोत्तम सेवा पुरवावी, असे ठरविण्यात आले. संवाद अधिक मजबूत करण्यासाठी नियमित बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीचा समारोप करताना पोलीस निरीक्षक पांढरे म्हणाले की, पत्रकार हे समाजाचे एक महत्त्वाचे अंग आहेत आणि त्यांची भूमिका समाजातील प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याची आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांच्याशी सदैव संवाद साधून समाजाच्या हितासाठी एकत्रितपणे काम करत राहील. दरम्यान, पत्रकारांच्या वतीने अनिस माणियार (रायगड टाइम्स) यांनी वडखळ पोलिस प्रशासनाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सफलतेने झाले, आणि भविष्यात देखील अशा संवाद बैठकींचे आयोजन करून दोन्ही क्षेत्रांमधील संबंध आणखी मजबूत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.