वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षी वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर पोलिसांनी यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे. पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली, २०२४ मध्ये या गुन्ह्यांचा आलेख उतरत्या मार्गावर असल्याचे दिसून आले आहे. नागरिक व व्यापारी वर्ग यामुळे समाधान व्यक्त करत आहेत.
पदभार स्विकारल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी आपल्या अनुभवी क्राईम ब्रँच सेवेचा उपयोग करून, ग्रामस्थ, विद्यार्थी, दुकानदार यांना जागरुकतेचे मार्गदर्शन केले. चोरी आणि घरफोडी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आखून पोलिसांनी रात्रंदिवस गस्त सुरू ठेवली.
घरफोडी, दुकानफोडी, ए.टी.एम. चोरी आणि सोनसाखळी चोरीसारख्या घटनांमुळे पसरलेल्या भितीचे वातावरण पोलिसांच्या प्रभावी कृतींमुळे निवळले. दक्ष गस्त, सतर्कता मोहीम, आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यामुळे या हद्दीत गुन्हेगारी घटनांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे.
ग्रामस्थ आणि व्यापारी वर्ग यामुळे वडखळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत असून, परिसरात पुन्हा सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.