वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ

Vanchit Bahujan Aghadi

मुंबई ( मिलिंद माने ) :

सन २०२४ च्या. विधानसभा निवडणुकीचे जागा वाटपावर सर्वच पक्षांचे अजून भिजत घोंगडे असताना वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ११ उमेदवारांची पहिली यादी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईमध्ये जाहीर केली.
राज्यातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची. आचारसंहिता लागण्यास अजून दहा ते १५ दिवसाचा अवधी आहे त्यापूर्वी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील. जागा वाटपावरून राज्यातील महाविकास आघाडी व महायुती या दोघांमध्ये कुरघोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री कोण व महायुतीचा मुख्यमंत्री कोण यावरून देखील सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणावर मागील काही दिवसापासून सर्वच पक्ष एकमेकांवर दबावाचे राजकारण करीत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई राज्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर करून सर्वच पक्षांना धक्का दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई जाहीर केलेल्या अकरा उमेदवारांची मतदार संघ आहे नावे पुढीलप्रमाणे;
११. रावेर मतदार संघ – संभाजी पाटील
२४ शिंदखेड राजा मतदार संघ – सविता मुंडे
३४ वाशिम मतदार संघ  – मेघा किरण डोंगरे
३६ धामणगाव रेल्वे मतदारसंघ –  निलेश विश्वकर्मा
५२ नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – विनय भांगे
६२ साकोली विधानसभा मतदारसंघ – अविनाश नने
८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ – फारूक अहमद
८८ लोहा विधानसभा मतदारसंघ – शिवा नरगळे
१०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ विकास – रावसाहेब डांगे
२२२ शेवगाव विधानसभा मतदारसंघ – किशन चव्हाण
२८६ खानापूर विधानसभा मतदारसंघ संग्राम – किसन माने
भाजपाचे देवेंद्र फडणवीस सहित नाना पाटोळे यांच्या मतदार संघात वंचित उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या ५ काँग्रेसच्या तर राष्ट्रवादीच्या १ शिवसेनेच्या १ तर शेतकरी कामगार पक्षाच्या १ मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे केला आहे.
सध्या विधानसभेतील अस्तित्वात असणाऱ्या परंतु वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या मतदार संघातील नावे;
११ रावेर विधानसभा मतदारसंघ शिरीष मधुकरराव चौधरी काँग्रेस
२४ सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघ राजेंद्र भास्करराव शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस
३४ वाशिम विधानसभा मतदारसंघ लखन सहदेव मलिक भाजपा
३८ धामणगाव रेल्वे प्रताप अरुण भाऊ अडचण भाजपा
५२ नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भाजपा
६२ साकोली विधानसभा मतदारसंघ नाना भाऊ फालगुणराव पटोले काँग्रेस
८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ मोहनराव मारोतराव हंबर्डे काँग्रेस पक्ष
८८ लोहा विधानसभा मतदारसंघ श्यामसुंदर शिंदे शेका पक्ष
१०९ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ अतुल मोरेश्वर सावे भाजपा
२२२ पर्वती विधानसभा मतदारसंघ घ माधुरी सतीश मिसाळ भाजपा
२८६ खानापूर विधानसभा मतदारसंघ अनिल कल- जेराव बाबर शिवसेना शिंदे गट
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलेल्या ११जागांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना याप या पक्षाच्या संभाव्य जागांवर अद्याप तर उमेदवार जाहीर केलेले नाहीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading