PEN : जनसंवाद दौर्‍यात अनंत गीतेंची तोफ धडाडली !

Anant Gite1
पेण  ( राजेश प्रधान ) :
देशात दडपशाही सुरू असून हुकूमशाहीची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत लोकशाही व संविधान वाचवण्याकरिता इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. देशात व राज्यात सत्ताधिकाऱ्यांकडून धडक सही करण्यात येत आहे. केवळ फसव्या जाहिराती व जुमलेबाजी करण्यात येत आहे. मागील दहा वर्षात सामान्य जनतेचे जीवन अधिक खडतर झाले आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या ७ मे रोजी इंडिया आघाडी व महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व इंडिया आघाडीचे  32 लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते यांनी पेण तालुक्यातील जिते जिल्हा परिषद मतदार संघात आयोजित जनसंवाद दौऱ्यात केले.
अबकी बार मोदी हद्दपार
ते पुढे म्हणाले की, बॅरिस्टर ए.आर.अंतुले, शरद पवार, जयंत पाटील व मधुकर ठाकूर यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सुनील तटकरे वर मतदार विश्वास ठेवणार नाहीत व त्यांना जनता धडा शिकवेल. भाजपने केलेल्या सर्वे मध्ये 542 पैकी फक्त 172 जागाच भाजपला मिळणार असल्याने घाबरलेल्या भाजपने आपकी बार 400 पार चा नारा दिला आहे. परंतु असा नारा देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत. प्रत्यक्षात अबकी बार मोदी सरकार हद्दपार असे निकाल घोषित होतील या देशात मोदीविरोधी सुनामी येणार आहे. यावेळी मोदी पराभूत होऊन राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास गीते यांनी यावेळी बोलून दाखविला.
तटकरेंकडे  धनशक्ती तर आमच्याकडे जनशक्ती : जयंतभाई पाटील
 पेण विधानसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. अनंत गीते यांनी त्यांच्या कारकिर्दीत रायगडसह रत्नागिरीमध्ये सर्वाधिक विकास निधी देऊन विकास केला होता. त्यामुळेच येथील जनतेने त्यांना सहा वेळा लोकसभेत निवडून दिले. यावेळीही सर्व रेकॉर्ड मोडून अनंत गीते सर्वाधिक मताधिक्यांनी 32 लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला. तटकरेंकडे धनशक्ती असली तरी आमच्याकडे जनशक्ती आहे. इंडिया आघाडीच्या मागे सामान्य जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे गीते यांचा विजय निश्चित आहे.
मोदींची गॅरंटी फसवी असून बहुत हुई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार अशी जाहिरात करून महागाई दहापट वाढवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यावेळी जनता त्यांना धडा शिकवेलच 15 लाखांचे खोटे आश्वासन देणाऱ्या मोदींच्या गॅरंटीवर यावेळी जनता विश्वास ठेवणार नाही. यापूर्वी शेती व शेतीमालावर कोणताही जीएसटी नव्हता परंतु मोदी सरकारने शेती करिता लागणारे खत व इतर कीटकनाशकांवर 18% जीएसटी आकारून शेतकऱ्यांची लूट केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव न देणाऱ्या मोदी सरकारला या निवडणुकीत सामान्य जनता हद्दपार करेल असा विश्वास जयंतभाई पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
Sabha
गद्दाराला टकमक टोकावरून ढकला : प्रशांत पाटील
 राष्ट्रवादीचे समन्वय प्रशांत पाटील म्हणाले की, शरद पवार व राष्ट्रवादीने सुनील तटकरेला भरभरून दिलं तरीसुद्धा त्यांनी गद्दारी कली अश्या गद्दाराला धडा शिकवण्याची वेळ आली रायगड च्या जनतेने या गद्दाराला टकमक टोका वरून ढकलून द्या त्याचे डिपोजीट जप्त करा असे आवाहन यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री व इंडिया आघाडीचे  32 लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते, शेकापचे सरचिटणीस जयंतभाई पाटील, राष्ट्रवादीचे समन्वय प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, शेकाप नेते पी. डी. पाटील, शेकापच्या स्मीता पाटील, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष महेश पोरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल, शिवसेना विधानसभा समन्वयक शिशिर धारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंड्याशेठ पाटील, युवा सेनेचे सुधीर ढाणे, आमिर ठाकूर, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, तालुका समन्वयक दिलीप पाटील, तालुका सहसंपर्कप्रमुख भगवान पाटील, शहर प्रमुख मयुरेश चाचड, युवा सेना विधानसभा अधिकारी किरण पिंपळे, सचिन ढोबळे, जिते विभाग प्रमुख राजू पाटील, कांचनथळे अच्युत पाटील, ईश्वर शिंदे, योगेश पाटील, छाया काईनकर, मेघना चव्हाण, महानंदा तांडेल, दर्शना जवके, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव स्वरूप घोसाळकर, शिवसेनेचे पेण तालुका प्रचार प्रमुख समिर म्हात्रे, उप तालुका प्रमुख संतोष पाटील, शेकाप नेते महादेव दिवेकर, आर. के. पाटील, राजेश्री घरत, दुष्मी खारपाडा सरपंच नेत्रा घरत, बळवली सरपंच उज्वला पाटील,आंबिवली सरपंच अरुणा पवार, तुकाराम म्हात्रे, लव्हेंद्र मोकल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading