राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं की, ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांची तपासणी होणार आहे.
मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं की, योजनेच्या मूळ शासन निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. मात्र, स्थानिक प्रशासन आणि लाभार्थींनी नोंदवलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल. ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहेत किंवा ज्यांच्याविरुद्ध तक्रारी आल्या आहेत, अशा अर्जदारांची पडताळणी होणार आहे.
तटकरे यांनी नमूद केलं की, “आम्हाला इन्कम टॅक्स विभाग आणि आरटीओ विभागाची मदत घेत लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी करावी लागेल.” तसेच, राज्याबाहेर गेलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
मंत्री तटकरे यांनी सांगितलं की, “काही महिलांनी दोन वेळा अर्ज दाखल केले आहेत. तसेच, काही लाभार्थींनी स्वतःच पात्र नसल्याची माहिती दिली आहे.”
योजनेसंदर्भातील तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी सरकार विशेष पाऊल उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.