पुराव्यांसकट आमदारांचा कारनामा उघड करणार- पत्रकार परिषदेतून सुधाकर घारे यांनी फुंकले रणशिंग

Sudhakar Ghare
कर्जत (गणेश पवार) : 
परिवर्तन विकास अघाडीच्या पत्रकार परिषदेत कर्जत मधिल होणाऱ्या पनवेल – कर्जत नविन रेल्वे कॉरिडॉरला स्थानकाला हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे नांव देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे केलेल्या मांगणी संदर्भात व कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी छत्रपत्ती संभाजी महाराज यांच्या बदल केलेले चुकीचे वक्तव्य व खासदार सुनिल तटकरे यांना औरंगजेबाचा उपमा देत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी लवकरच पुराव्यांसकट आमदारांचा कारनामा उघड पडणार असल्याचे जाहीर करत आमदार थोरवे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले तर पोलिस व आमदार थोरवे यांची ऑडिओ क्लिप समोर आणत ऐ तो टेलर हे अब पूरा पिक्चर बाकी हे असल्याचे वक्तव्य करत, बीड मधील आकाचा आका कोण या प्रमाणे कर्जत खालापूर मधील आकाच्या आकाचा लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केला जाईल यासाठी आम्हाला पाकारांचे देखील सहकार्य व्हावे अशी पत्रकाराना देखील सुधाकर घारे यांनी विनंती केली.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कर्जत येथील संर्पक कार्यालयात दि. ७ मार्च २०२५ रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात कर्जत तालुक्याती हुतात्मा विर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांनी दिलेले बलिदान व त्यांच्या कार्याची कीर्ती अखंड ठेवण्या प्रती कर्जत मधिल होणाऱ्या पनवेल – कर्जत नविन रेल्वे कॉरिडॉरला स्थानकाला हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे नांव देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे केलेला पत्रव्यवहार व पाठपुरावा हा देखील सुरु आहे. मात्र यांचे श्रेय आपल्याला मिळणार नसल्याने या मध्ये जाणीवपूर्वक खोडा घालण्याचे काम सुरु असल्याने, आपल्याला आपल्या मागणीनुसार आपल्या कर्जत भूमीती हुतात्म्यांचे नाव व त्यांची देशाच्या स्वातंत्र्यलढ्याप्रती असलेली कामगिरी अजरामर ठेवण्यासाठी आपला लढा हा सूरू ठेवावा लागेल, यासाठी आंदोलने करावी लागली तर आंदोलने करण्याची तयारी देखील आमची आहे.
या लढयात सर्वांची साथ मिळावी असे अहवान सुधाकर घारे यांनी करत, कर्जत -खालापूर विधान सभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबाग येथील क्रिकेटच्या सामन्याच्या कार्यक्रमा प्रसंगी छावा चित्रपट आपण सर्वांनी पाहीला आसेल. संभाजी महाराजांबदल औरंगजेबाने जे कृत्य केले ते आजच्या युवकांना स्फूर्ती देणारे आहे. या केलेल्या वक्तव्याचे तसेच याच कार्यक्रमा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत सुतारवाडीत बसलेला औरंगजेब असे केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध देखील सुधाकर घारे यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. 
लवकरच पुराव्यांसकट आमदारांचा कारनामा उघड पडणार असल्याचे जाहीर करत आमदार थोरवे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले तर पोलिस व आमदार थोरवे यांची ऑडिओ क्लिप समोर आणत ऐ तो टेलर हे अब पूरा पिक्चर बाकी हे असल्याचे वक्तव्य करत, बीड मधील आकाचा आका कोण या प्रमाणे कर्जत खालापूर मधील आकाच्या आकाचा लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केला जाईल यासाठी आम्हाला पाकारांचे देखील सहकार्य व्हावे. असे सुधाकर घारे यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading