रोह्यात शेकापच्या कार्यकर्ता नियुक्ती आढावा बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद

Shekap Baithak Roha
कोलाड (श्याम लोखंडे) :
लोकसभा विधान सभा निवडणुकीनंतर शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नेते भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात पक्षाचा संवाद मेळावा मोठया उत्साहात पार पडला तद्नंतर पुन्हा पक्षाची नव्याने मोर्चे बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या पदावरील नव्याने नियुक्त्या यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जुन्या नव्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत कार्यत्यांच्या नवीन पद नियुक्त्या नेमणूक करण्यात येत असून यासाठी रोहा येथे बुधवारी ५ मार्च रोजी कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी तालुकास्तरावरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता नियुक्तीच्या आढावा बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला तर येत्या काळात नवे कार्यकर्ते घडवून पक्षाचा पाया भक्कम करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी कार्यकर्ते समावेत केले.
रोहा येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात संपन्न झालेल्या कार्यकर्ता आढावा बैठक जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, रायगड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड.मानसीताई म्हात्रे, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, जिल्हा बँकेचे संचालक गणेश मढवी, बँक मॅनेजर प्रतीक नाईक,मारुती खांडेकर, गोपीनाथ गंभे,शिवराम महाबले,संदेश विचारे, गांगल ताई, कांचन माळी,सह तालुक्यातील आजी माजी तालुका चिटणीस व प्रमुख कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.
उत्सपूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या तसेच शे.का.पक्षाची नविन पदाधिकारी पद नियुक्ती आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना खैरे पुढे म्हणाले की आपण महाविकास आघाडीतून लोकसभा विधान सभा निवडणूक लढलो त्यात जरी आपला पराभव झाला असला तरी कोणीही खाचणून जाऊ नका पुन्हा जोमाने पक्ष नेते भाई जयंता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला बळकटी मिळत आहे याचे प्रत्यय संवाद मेळाव्यात आला.
यासाठी पुन्हा आपण जिद्दीने एकत्रित येऊन काम करू पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका ह्या जिंकण्यासाठी येत्या काळात पक्षाचा पाया भक्कम करून पुन्हा लाल बावटा फडकेल यासाठी कार्यतत्पर होतकरू युवक,कार्यकर्ते, महीला कार्यकर्त्या यांची नियुक्ती करण्यात येत असल्याने यासाठी मोठ्या संख्येने नावे पुढे येत असल्याचा आनंद व्यक्त करत या नियुक्त्या लवकरच पक्ष नेते भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याचे शेवटी म्हणाले.
 या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना जेष्ठ नेते शंकरराव म्हसकर हे म्हणाले की, रोह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संघर्ष करून अनेक समस्यांवर पूर्वी न्याय दिला आहे तसेच येत्या काळात कुंडलिका सिंचनातून बारमाही वाहणारे उजवा तीर आणि डावा तीर कालव्याच्या पाण्यासाठी तसेच येथील शेतकऱ्यांची तेराशे हेक्टर जमीन ही पुन्हा ओलिताखाली आणू त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी कारणात शेतकऱ्यांची घरे जामीन सरकारने अल्प दरात भूसंपादित केली अशा अल्प भूधारक शेतकऱ्यांना देखील पक्ष नेते भाई जयंता पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे इंदापूर दरम्यानच्या बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच रोहा तालुका हा लाल बावटा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचा आहे.
नवीन नियुक्त्या यासाठी अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी आपली नावे दिली तर रोहा तालुका चिटणीस, कामगार आघाडी, शेतकरी संघटना,पुरोगामी आघाडी,पुरोगामी विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी, रस्ते बाधित शेतकरी संघटना , आदिवासी संघटना, आदिवक्ता, प्रवक्ता, अल्पसंख्याक,पुरोगामी शिक्षण आघाडी, झोपडपट्टी पुरोगामी, मच्छी मारी संघटना, आपत्कालीन व्यवस्थापन संघटना, यांच्यासह विविध पदांवर नव्याने कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नेमणूक करण्यात येणार असून या नियुक्त्या नेते भाई जयंता पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहेत .
जिल्ह्याभर तसेच तालुका स्थरावर कार्यकर्त्यांची प्रशिक्षण देणार, त्यात पक्षाची विचारसरणी,पक्ष संघटना सोशल मिडीयाचा वापर, शेतकरी, कष्टकरी,श्रमजीवी, कामगार, यांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील कसे राहता येईल असे कार्यकर्त्याला सक्षम प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले तर कार्यकर्त्ये पद निवडीत पक्ष नेते भाई जयंता पाटील हे जे नव्याने कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नेमणूक करतील ते सर्वांना मान्य असल्याचे सदरच्या आढावा बैठकीतून कार्यकर्त्यांकडून सर्वानुमते सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading